Panchamrut Recipe benefits  sakal
Ganesh Chaturthi Festival

Panchamrut Benefits प्रसादाचे शास्त्र ! पंचामृताचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

Panchamrut Recipe Benefits पावसाळी वातावरणातील जिवाणूंच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्याची क्षमता शरीरात पंचामृतामुळे निर्माण होते.

सकाळ डिजिटल टीम

- राधिका शहा, आहारतज्ज्ञ

दही, तूप, मध, साजूक तूप आणि साखर या पाच पदार्थांच्या मिश्रणापासून पंचामृत तयार होते. या मिश्रणामध्ये म्हणजेच पंचामृतामध्ये जिवाणूजन्य आजारांना प्रतिकार करण्याची क्षमता असते. त्यामुळे पावसाळी वातावरणातील जिवाणूंच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्याची क्षमता शरीरात पंचामृतामुळे निर्माण होते. 

दही

दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस नावाचे जिवाणू असतात. त्यामुळे आपल्या आतड्यांची कार्यक्षमता वाढते. अॅसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता अशा समस्यांसाठी दही उपयुक्त ठरते. 

दूध

दुधामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शिअम असते. यामुळे शरीराची हाडे मजबूत होतात. तसेच यात जीवनसत्त्व आणि पोषक खनिजे यासारखे घटकही असतात. त्याचा फायदा शरीर बळकट होण्यासाठी होतो.

मध 

मधामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत मिळते. फक्त शरीर मजबूत असून उपयोग नसतो. तर रोगप्रतिकारकशक्तीही आवश्यक असते. जी मधाच्या सेवनामुळे मिळते.

साखर

चौथा घटक म्हणजे साखर. साखरेच्या सेवनामुळे शरीराला ऊर्जा मिळते. याद्वारे पंचामृतामधील उष्मांक वाढतो.

साजूक तूप

साजूक तूप पाचवा घटक असतो. तुपामध्ये 'ए' , 'बी' , 'ई' , 'के' अशी मेद तयार करणारी जीवनसत्त्वे असतात.

या पाचही घटकांच्या मिश्रणातून मानवी शरीरातील पचन, स्नायू, मेंदू अशा वेगवेगळ्या संस्थांचे कार्य सुधारण्यात मदत मिळते. गर्भवती महिलांना याचा सर्वाधिक उपयोग होतो. यामुळे मेंदूची वाढ जास्त चांगल्या पद्धतीने होते. तसंच त्वचा आणि केसांचे आरोग्य देखील सुधारते. पंचामृताचे नियमित सेवन केल्यास याचा शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

मधुमेहींनी घ्यावी विशेष काळजी

पण यात मध आणि साखरेचा समावेश असल्याने मधुमेहग्रस्त रुग्णांनी पंचामृताचे नियमित सेवन करू नये. या लोकांनी प्रसादाइतकेच त्याचे सेवन करावे किंवा मधुमेहींच्या पंचामृतात कमी मध घालून साखरेऐवजी केळे किंवा एखादे फळ मिक्स करावे. असे केल्यास पंचामृत  मधुमेहींसाठी उपयुक्त ठरेल.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT