Kolhapur Ganeshotsav DJ Sound System esakal
Ganesh Chaturthi Festival

Kolhapur Ganeshotsav : कोल्हापुरात दुसऱ्या दिवशीही DJ चा दणदणाट; लेसर शोचाही झगमगाट, गणेशमूर्तींचं आगमन सुरूच

समृद्धीच्या पावलांनी आज (गुरुवारी) सर्वत्र गौराईचे आगमन होणार

सकाळ डिजिटल टीम

सामूहिक आरतींनी रात्री सारा परिसर एकवटत असून, विद्युतरोषणाईने सारे शहर उजळून निघाले आहे.

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या (Kolhapur Ganeshotsav) दुसऱ्या दिवशीही शहरातील बहुतांश मंडळांच्या गणेश आगमन मिरवणुका निघाल्या. यानिमित्तानेही साउंड सिस्टीमचा दणदणाट आणि लेसर शोचा झगमगाट अनुभवायला मिळाला.

शहरातील मध्यवर्ती परिसराबरोबरच उपनगरातही काल मूर्तींचे मोठ्या संख्येने आगमन झाले. दरम्यान, गौराईच्या खेळांचा फेर आता शहराच्या पेठा-पेठांतमध्‍ये रंगू लागला आहे. ऋषीपंचमीनिमित्त आज विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन झाले.

शहरातील बहुतांश ठिकाणी आता मूर्ती प्रतिष्ठापना झाली असून, विविध धार्मिक विधींना प्रारंभ झाला. सामूहिक आरतींनी रात्री सारा परिसर एकवटत असून, विद्युतरोषणाईने सारे शहर उजळून निघाले आहे. काही ठिकाणी प्रबोधनात्मक देखाव्यांनाही आता प्रारंभ होणार आहे. जुना बुधवार पेठेतील हाय कमांडो फ्रेंडस सर्कलच्या ‘जुना बुधवार पेठेचा वसा आणि वारसा’हा देखावा आज (गुरुवारी) सायंकाळी सात वाजता खुला होणार आहे. विविध मंडळांनी साकारलेल्या मंदिराच्या प्रतिकृतीही आता खुल्या होऊ लागल्या आहेत.

गौराई येणार आज

समृद्धीच्या पावलांनी आज (गुरुवारी) सर्वत्र गौराईचे आगमन होणार असून, त्यासाठीच्या खरेदीसाठी आज बाजारपेठेत मोठी गर्दी राहिली. गौराईंचे आगमन झाल्यानंतर त्या माहेरचा पाहुणचार स्वीकारून विसावणार आहेत. शुक्रवारी (ता. २२) शंकरोबांचे आगमन होणार असून, गौराई नटणार आहेत. शनिवारी (ता. २३) घरगुती गणपती आणि गौराईंचे विसर्जन होणार आहे. अर्थात गौराई पुन्हा सासरी जाणार आहेत. साहजिकच गौराईच्या खेळांनी आता रात्री जागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update: राज ठाकरे मातोश्रीवर दाखल!

SCROLL FOR NEXT