Chakarmani Kankavali Railway Station esakal
Ganesh Chaturthi Festival

Konkan Ganeshotsav : चाकरमान्यांच्या गर्दीमुळं कणकवली रेल्‍वे स्थानकात कडक बंदोबस्त; आठ पोलिसांसह 20 जवान तैनात

परतीच्या प्रवासासाठी कणकवली रेल्‍वे स्थानकात (Kankavali Railway Station) चाकरमान्यांची मोठी गर्दी होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोकण रेल्‍वेचा मार्ग एकेरी असल्‍याने जादा गाड्या विलंबाने धावत आहेत.

कणकवली : परतीच्या प्रवासासाठी कणकवली रेल्‍वे स्थानकात (Kankavali Railway Station) चाकरमान्यांची मोठी गर्दी होत आहे. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील रेल्‍वे स्थानकात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नियमित आठ पोलिस (Police) कर्मचाऱ्यांबरोबरच जादा २० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

दरम्‍यान, मुंबईला जाणाऱ्या नियमित गाड्या आज वेळेवर सुटल्‍याने प्रवाशांना दिलासा मिळाला. तर गणेशोत्‍सव विशेष गाड्या दीड ते दोन तास विलंबाने धावत होत्या. पाच आणि सात दिवसांचा गणेशोत्‍सव आटोपून चाकरमानी मुंबईला रवाना होत आहेत.

यात रेल्‍वे प्रवासाला प्राधान्य देण्यात आले आहे. मात्र, रविवारी (ता. २४) पर्यंत गणेशोत्‍सव (Konkan Ganeshotsav) विशेष गाड्या तीन ते पाच तास विलंबाने धावत असल्‍याने चाकरमानी आणि रेल्‍वे कर्मचारी यांच्यात वारंवार वादंगाचे प्रसंग निर्माण होत होते.

तसेच कणकवली रेल्‍वे स्थानकात प्रचंड गर्दी होत असल्‍याने नियमित पोलिसांना या गर्दीवर नियंत्रण ठेवणे कठीण जात होते. त्‍यामुळे रेल्‍वे सुरक्षा बलाचे जादा २० जवान कणकवली स्थानकात तैनात केले आहेत. या पोलिसांच्या मदतीला होमगार्ड देखील तैनात करण्यात आले आहेत. यंदा चाकरमान्यांच्या सेवेसाठी कोकण रेल्‍वे मार्गावर तब्‍बल ३५० फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत.

रेल्‍वे गाड्या दोन तास विलंबाने

कोकण रेल्‍वेचा मार्ग एकेरी असल्‍याने जादा गाड्या विलंबाने धावत आहेत. आज मुंबईला जाणारी दुपारच्या सत्रातील कुडाळ-एलटीटी तीन तर सायंकाळच्या सत्रातील कुडाळ ते एलटीटी गाडी दोन तास विलंबाने धावत होती. सावंतवाडी-सीएसएमटी एक तास उशिरा धावत होती. मडगाव-एलटीटी मात्र नियोजित वेळेनुसार धावत होती. तसेच ‘तुतारी’, ‘कोकणकन्या’ या एक्‍स्प्रेस गाड्या देखील नियमित वेळेत सुटल्‍याने चाकरमान्यांना दिलासा मिळाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Pune News: रेल्वे चालकाला सात किलोमीटर आधीच दिसणार सिग्नल; प्रवाशांना सुरक्षेचे ‘कवच ४.०’, २५० किमीवर यशस्वी चाचणी!

Rohit Sharma चे खिलाडूवृत्तीचं ज्ञान पाजळणाऱ्या पाकिस्तानला कृतीतून उत्तर! IND vs PAK मॅचआधी वसीम अक्रमशी गळाभेट; Video Viral

Nagpur Crime : भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला; गंभीर जखमी, संतप्त कार्यकर्त्यांची रुग्णालयासमोर गर्दी

SCROLL FOR NEXT