Kothimbir_Modak 
नैवेद्य-रेसिपी

नैवैद्य बाप्पाचा: कोथिंबीर मोदक

सुजाता नेरुरकर

साहित्य - एक कोथिंबीरीची छोडी जुडी, १ कप खोवलेला नारळ, १ टीस्पून आले (बारीक चिरुन), १ टीस्पून लसणू (बारीक चिरुन) ३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १ टीस्पून खसखस (भाजून), अर्धा टीस्पून गरम मसाला, मीठ चवीनुसार

पारीसाठी - दोन कप मैदा, १ टेबलस्पून गरम तेल, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून धने-जिरे पावडर, २ टेबलस्पून दूध, मीठ चवीनुसार, मोदक तळण्यासाठी तेल

कृती - कोथिंबीर धुऊन बारीक चिरून घ्यावी. नंतर त्यामध्ये खोवलेला नारळ, आले, लसूण, मिरची, खसखस भाजून, गरम मसाला व मीठ घालून मिश्रण तयार करावे. एका परातीत मैदा, तेलाचे कडकडीत मोहन, हळद, धने-जिरे पावडर, २ टेबलस्पून दूध व मीठ घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. १० मिनिटांनी त्याचे लहान गोळो करुन पुरी लाटून त्यामध्ये १ टेबलस्पून मिश्रण ठेऊन पुरी बंद करावी व त्याला मोदकाचा आकार द्यावा. कढईमध्ये तेल गरम करुन मोदक गुलाबी रंगावर मंद विस्तवावर तळून घ्यावेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Private Bus Ticket : चाकरमान्यांच्या परतीचा प्रवास महागला! कोल्हापूर ते मुंबई तिकीट दर पोहोचला 2700 रुपयांवर...; खासगी आराम बसेसचे बुकिंग हाऊसफुल्ल

Asian Games : महाराष्ट्राच्या लेकांनी वेधला रौप्यपदकाचा अचूक नेम; महिलांपाठोपाठ भारताच्या पुरुष नेमबाजी संघाचाही डंका

विलासराव देशमुखांसमोर जिनिलियाने केलं असं काही, रितेशलाच बसला धक्का; म्हणाला, “मी दचकलो…”

Marathi News Live Updates : नांदेडमध्ये गणरायाचे विसर्जन करताना Engineering च्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

Thane News: ठाण्यात दणदणाट! विसर्जन मिरवणुकांचा आवाज १०५ डेसिबलवर, ध्वनिप्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

SCROLL FOR NEXT