Ganeshotsav 2023 eSakal
Ganesh Chaturthi Festival

Ganeshotsav 2023 : लीफ व्हिलेजमध्ये पोहोचला बाप्पा; गणपतीसोबत दिसले नारुतो आणि सासुके! पाहा व्हिडिओ

Naruto Ganesha : गणपतीसाठी केलेला एक अनोखा देखावा व्हायरल होतो आहे.

Sudesh

दरवर्षी गणेशोत्सवात एका गोष्टीचं आकर्षण सर्वांनाच असतं, ते म्हणजे मंडपाची सजावट. यावर्षी कित्येक ठिकाणी गणपतीसाठी चांद्रयान-3 ची सजावट करण्यात आली होती. यासोबतच राम मंदिर आणि इतर गोष्टींचे देखावे देखील पहायला मिळत आहेत. यातच आता गणपतीसाठी केलेला एक अनोखा देखावा व्हायरल होतो आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये भारतात अ‍ॅनिमेची क्रेझ वाढली आहे. हीच क्रेझ आता गणेशोत्सवात देखील दिसून येत आहे. एका मंडळाने चक्क 'नारुतो' या प्रसिद्ध अ‍ॅनिमेचा देखावा बाप्पासाठी केलेला पहायला मिळालं. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

या व्हिडिओमध्ये दिसतंय, की गणपतीच्या मूर्ती शेजारी 'नारुतो' अ‍ॅनिमेमधील उझुमाकी नारुतो आणि उचिहा सासुके या दोघांचे पोस्टर उभारण्यात आलेत. सोबतच मागच्या बाजूला सासुके आणि त्याचा मोठा भाऊ इताची यांचंही एक पोस्टर लावलं आहे. नम्मा ओरु थेनी नावाच्या इन्स्टा हँडलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओला तीन लाखांहून अधिक लाईक्स आणि चार लाखांहून अधिक शेअर्स मिळाले आहेत.

काय आहे नारुतो?

नारुतो ही याच नावाच्या मांगावर (जपानी कॉमिक) आधारित अ‍ॅनिमे सीरीज आहे. यामध्ये उझुमाकी नारुतो हा लहान निंजा कशा प्रकारे आपल्या 'हिडन लीफ व्हिलेज'चा प्रमुख होतो, आणि मोठ्या निंजा युद्धाला थांबवतो याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. मैत्री आणि प्रेम याबाबतचे अनेक पैलू या अ‍ॅनिमेमध्ये पहायला मिळतात. तसंच यामध्ये कित्येक चांगले अ‍ॅक्शन सीन्स देखील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT