the Ganarayana pran pratishtha in the auspicious atmosphere In spite of the corona 
news-stories

कोरोनाचे सावट असूनही लाडक्या गणरायाची मंगलमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा 

सकाळवृत्तसेवा

लोणावळा : सर्वांनाच उत्सुकता असलेल्या गणरायाचे गणपती बाप्पा मोरया च्या जयघोषात कोरोनाचे सावट असतानाही मंगलमय वातावरणात लोणावळा परिसरात गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कोरोनाचा प्रादुर्भाव सध्या वेगाने होत आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वांचा लाडका व मांगल्याचे प्रतीक असलेला गणेशोत्सव सध्या साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. सार्वजनिक मंडळामध्ये सध्या निरुत्साह असला तरी गणेशोत्सवात घरगुती आरास व देखावे सजावटीसाठी नागरिकांची लगबग सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

गणेशाची मुर्ती भक्तीमय वातावरणात घरी नेण्यासाठी दुकानामध्ये शनिवारी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होत. शुक्रवार आणि शनिवारी लोणावळा शहरातील बाजारपेठ गर्दीने फुलून गेली होती. यादरम्यान बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने सोशल डिस्टन्सिंगचा मात्र फज्जा उडाला. आराशीच्या वस्तू, फराळ तसेच मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र होते. प्रामुख्याने गणपतीसाठी आकर्षक मखरे, सजावटीचे साहित्य, फळे, फुले-हार विक्रेत्याकडे प्रचंड गर्दी केली होती. शहरातील मिठाईच्या दुकानांमध्येही फराळाचे साहित्य खरेदीसाठी भाविकांची गर्दी होत आहे. यात बालगोपाळांचा उत्साह ओसंडून वाहत होता. खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याने लोणावळ्यातील शिवाजी पुतळा ते नगरपालिका रुग्णालयादरम्यान जत्रेचे स्वरूप आले होते.

Video : प्राण-प्रतिष्ठापना |गणेश पूजन । गणेशोत्सव २०२०

सामाजिक उपक्रमांवर भर

कोरोनाचा धोका असल्याने संसर्ग रोखण्यासाठी सार्वजनिक मंडळे पुढे सरसावली आहेत. मंडळांच्या वतीने यंदा मोठ्या प्रमाणावर खर्च टाळत सामाजिक उपक्रमावर भर देण्यात आला असून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. काही मंडळांनी कार्यकर्त्यांनी उत्साहात गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT