news-stories

भरतगाववाडीची तब्बल 229 वर्षांची परंपरा खंडित; गणेशाचा भंडारा रद्द

उमेश बांबरे

सातारा : गेली 229 वर्षे अखंडितपणे सुरू असलेल्या श्रीक्षेत्र भरतगाववाडी (ता. सातारा) येथील गणरायाचा भंडारा आणि 48 वर्षांची परंपरा असलेला सामुदायिक ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरिनाम सप्ताह यावर्षी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. सर्व गणेश भक्तांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन भरतगाववाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केले आहे. 

भरतगाववाडीचे ग्रामदैवत गणपती असून नवसाला पावणारा गणपती म्हणून या गणरायाचा नावलौकिक आहे. वर्षभर या गावातील मंदिरात देश-विदेशातील भक्त दर्शनासाठी येतात. गावात गणेशोत्सव काळात प्रतिष्ठापना केल्यानंतर गेली 48 वर्षे सामुदायिक ज्ञानेश्वर पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. गेली 229 वर्षे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी येथील गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. या सोहळ्यासाठी हजारो भक्तगण राज्य व देशभरातून येत असतात. 

यावर्षी भंडाऱ्याचे 229 वे वर्ष असून ग्रामस्थांच्या वतीने अखंडितपणे पुरणपोळीचा महाप्रसाद भक्तांसाठी ठेवला जातो. मात्र, यंदा कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर भरतगाववाडी येथील सर्वच धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या 229 वर्षांची भंडाऱ्याची परंपरा यावर्षी प्रथमच खंडित झाल्याने ग्रामस्थ आणि भक्तांत नाराजीचा सूर आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घेतलेल्या या निर्णयासाठी सर्व भक्तांनी सहकार्य करावे, असे आवाहन ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी केले आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BRA vs JPN World Cup 2026: व्हॉट अ मॅच... ब्राझीलने शेवटच्या मिनिटाला मिळवला थरारक विजय, जपानच्या लढाऊवृत्तीचे जगभरात कौतुक

NCP finance portfolio: अर्थखाते पुन्हा राष्ट्रवादीकडे जाणार, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर जय पवारांचा दावा

Raigad Journalists Protest: पत्रकारांना जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी रायगड पत्रकार संतप्त; खासदार संजय दिना पाटील यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

Aashadhi Wari Restrictions: आषाढी वारीत ४ ते ९ जुलैदरम्यान आळंदीत विवाह, साखरपुडा बंद; पोलिसांकडून धर्मशाळा व मंगल कार्यालयांना स्पष्ट सूचना

Pune Water Crisis : मान्सून लांबल्याने पुण्यावर पाणीटंचाईचे संकट, धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचा महापालिकेचा प्रयोग चर्चेत

SCROLL FOR NEXT