news-stories

लाहोटी, झंवर, सारडा, लढ्ढा, राठी चमकले; 'माहेश्वरी'ची काैतुकाची थाप

दिलीपकुमार चिंचकर

सातारा ः माहेश्वरी युवा संघटनेच्या वतीने घेतलेल्या घरगुती गणेशमूर्ती बनविणे स्पर्धेस कऱ्हाड, महाबळेश्वर, फलटणसहित संपूर्ण जिल्ह्यातील माहेश्वरी समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

गणेशोत्सवाच्या धर्तीवर सध्याच्या कोरोनामय वातावरणात आपल्या समाजाला बाप्पामय बनवून सकारात्मक भक्तिमय वातावरण निर्माण करण्याच्या हेतूने सातारा माहेश्वरी युवा संघटनेने आपल्या समाजबांधवांसाठी "घरगुती गणेशमूर्ती बनविणे' स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात कैक आबालवृद्ध समाजवासीयांनी आपल्यातील मूर्तिकाराला साद घालून घरबसल्या स्वतःच्या करांनी आपल्या बाप्पाला आकार दिला.

भाविकांचे श्रध्दास्थान श्री शंकर पार्वती गणपती (महादेव)

या स्पर्धेमध्ये सहभागी स्पर्धकांनी वैविध्यपूर्ण अशा पर्यावरणपूरक मूर्ती बनवून सादर केलेले कौशल्य स्पर्धेचे परीक्षण करणाऱ्या कुंभार समाजाचे मूर्तिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन राजे आणि उपाध्यक्ष दिनेश कुंभार यांची वाहवा मिळवून गेले.

आमच ठरलं ! आठ सप्टेंबरपर्यंत लॉकडाउन 

स्पर्धेमध्ये अनुक्रमे राघव निलेश लाहोटी, संगीता धीरज झंवर, ऍड. रोहन सागर सारडा, कौशल धीरज लढ्ढा व खुशी उदय राठी यांनी क्रमांक मिळवले. विजेत्यांना युवा संघटनेकडून गणेशभक्त द्वारकानाथ कासट परिवारातर्फे प्रिंटेड प्रशस्तिपत्र, ट्रॉफीज आणि रोख बक्षिसांनी सन्मानित करण्यात आले.

हे आहेत रोज जमिनीवर बसण्याचे फायदे.. या समस्यांपासून होईल सुटका.. 

सहभागी मूर्तिकारांचे व्हिडिओज, विजेत्यांच्या प्रतिक्रिया या युवा संघटनेच्या सातारा माहेश्वरी युवा संघटन या यू ट्यूब चॅनेलवर पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. स्पर्धेसाठी पवन लाहोटी, विक्रांत राठी, दर्शन लाहोटी, पंकज राठी, धीरज कासट, संकेत कासट व अनुप मिणियार यांनी परिश्रम घेतले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT