Rishi Panchami 2025  Sakal
Ganesh Chaturti Festival

Rishi Panchami 2025 : गणपती बाप्पांच्या आगमनानंतर येणारी ऋषी पंचमी महिलांसाठी का आहे खास?

Rishi panchami 2025 Date And Shubh Muhurt : हा उपवास केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि पूजनीय समजल्या जाणाऱ्या सप्तऋषींचे आशीर्वाद प्राप्त होतात

सकाळ डिजिटल टीम

ऋषी पंचमी हा सण गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. महिलांसाठी या व्रताचे विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी गंगा स्नान केल्याने पापमुक्ती मिळते आणि सप्तऋषींचे आशीर्वाद प्राप्त होतात. या दिवशी महिलांनी धान्य खाऊ नये अशी प्रथा आहे, त्यामुळे रानभाज्या आणि कंदमुळं खाल्ली जातात.

Rishi panchami 2025 Date And Shubh Muhurt :

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या तिथीला ऋषीपंचमी साजरी केली जाते. हे व्रत गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी होते. महिलांसाठी या व्रताचे विशेष महत्त्व आहे. असे मानले जाते की या दिवशी व्रत पाळल्यास व्यक्तीला जन्म-मृत्यूच्या दोषांपासून मुक्ती मिळते. ऋषीपंचमीच्या दिवशी गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे. गंगा स्नान केल्याने जीवनातील सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि पूजनीय समजल्या जाणाऱ्या सप्तऋषींचे आशीर्वाद प्राप्त होतात. ऋषी पंचमी कधी आहे, त्याचा शुभ काळ आणि महत्त्व जाणून घेऊया.

 

ऋषी पंचमी 2025 तिथी

२८ ऑगस्ट २०२५ रोजी ऋषीपंचमी साजरी केली जाणार आहे. ऋषीपंचमीला महिलांनी गंगेत स्नान केल्यास त्याचे फळ अनेक पटींनी वाढते. या दिवशी ऋषी मुनी वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, जमदग्नी, अत्रि, गौतम आणि भारद्वाज ऋषी यांची पूजा केली जाते.

महिलांसाठी का आहे खास

ऋषीपंचमीचं व्रत सवाशीण महिला करतात. या व्रताच्या दिवशी महिलांनी धान्य खाऊ नये अशी आख्यायिका आहे. आजही ग्रामीण भागात शेताची नांगरणी करताना बैलाचे पाय ज्या धान्याला लागतात आणि नांगराचा वापर केलेले अन्न पदार्थ ऋषीपंचमीच्या दिवशी खाल्लेच जात नाहीत. अशी प्रथा आहे.

म्हणूनच या दिवशी शेताच्या बांध्यावर उगवलेल्या रानभाज्या भाज्या आणि कंदमुळं खाल्ली जातात. आता या सर्व भाज्या शहरांमध्येही बाजारात उपलब्ध असतात. शहरांमध्ये काही भागात ग्रामीण भागातील भाजी विक्रेते या भाज्या विकायला घेऊन येतात.

ऋषी पंचमीसाठीचा मंत्र कोणता आहे?

कश्यपोतीर्थरद्वाजो विश्वामित्रोय गौतम:.

जमदगनिनिर्वशेषाचा सप्तैते ऋष्य: स्मृती:  

ऋषी पंचमी म्हणजे काय आणि ती गणपती बाप्पांच्या आगमनानंतर का साजरी केली जाते?

उत्तर: ऋषी पंचमी ही गणेश चतुर्थीनंतर भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी केली जाते. हा दिवस सप्तऋषींच्या पूजेसाठी समर्पित आहे आणि विशेषतः महिलांनी आपल्या पापांचे प्रायश्चित आणि आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी हा सण साजरा केला जातो.

ऋषी पंचमी महिलांसाठी का खास मानली जाते?

उत्तर: ऋषी पंचमी ही महिलांसाठी खास आहे कारण असे मानले जाते की या दिवशी सप्तऋषींची पूजा केल्याने महिलांना त्यांच्या अज्ञानात केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते, विशेषतः राजस्वला दोषापासून शुद्धीकरण होते. हा सण त्यांच्या आध्यात्मिक आणि शारीरिक शुद्धीसाठी महत्त्वाचा आहे.

ऋषी पंचमीच्या पूजेची प्रक्रिया काय आहे?

उत्तर: या दिवशी महिलांनी सकाळी लवकर स्नान करून सप्तऋषींची (कश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ) पूजा करावी. अर्घ्य देणे, उपवास ठेवणे आणि विशिष्ट वनस्पती किंवा पालेभाज्यांचे सेवन करणे ही या पूजेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Online Gaming: ऑनलाईन गेमिंग कायद्याच्या विरोधात उच्च न्यायालयात धाव; 'या' कंपनीने घेतला पुढाकार

Begging Prohibition Bill: भारतात भीक मागणे बेकायदेशीर करणारे 'हे' पहिले राज्य बनणार, नवीन विधेयक मंजूर, कधी लागू होणार?

Maratha Morcha : मराठा बांधव आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईला मार्गस्थ

Ischemic Heart Disease: इस्केमिक हृदयरोग म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि कारणे

Thane News: ठाणे महापालिका मुख्यालयावर महायुतीची छाप, पहिल्यांदाच झळकले पंतप्रधानांसह बॅनर

SCROLL FOR NEXT