Sangli Ganeshotsav Ganpati Idol Tears eyes Andhashraddha Nirmulan Samiti esakal
Ganesh Chaturthi Festival

सांगलीतील चिंचोलीत गणेशमूर्तीच्या डोळ्यांतून अश्रू; गणपती पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी, अंनिसनं केलं 'हे' आव्हान

महाराष्‍ट्रात गत दहा वर्षांपासून महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आहे.

सकाळ डिजिटल टीम

संबंधित जाधव यांनी चमत्कार तपासणीची परवानगी दिली, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यामागचे कारण, विज्ञान लोकांना सांगू शकेल.

शिराळा : चिंचोली (ता. शिराळा) येथे सचिन बापूराव जाधव यांच्या घरातील गणपतीच्या मूर्तीच्या (Sangli Ganeshotsav) डोळ्यांतून अश्रू येत असल्याचे काल (शनिवार) सकाळी आरती करण्यासाठी आलेल्या मुलांना दिसले. ही अश्रूंची अफवा समाजमाध्यमांवर व गावात पसरली.

गणपती पाहण्यासाठी नागरिकांनी जाधव यांच्या घरी गर्दी केली. त्याचे चित्रीकरणही समाज माध्यमांवर पसरले. त्यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात चिंचोली चर्चेत आले. या गणेशमूर्तीच्या (Ganpati Idol) डोळ्यांतून अश्रू येत असल्याच्या कथित चमत्काराचा दावा हा कायद्यानुसार गुन्हा आहे.

त्यामुळे संबंधिताविरोधात महाराष्ट्र जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने (Andhashraddha Nirmulan Samiti) केली आहे. समितीचे कार्यकर्ते राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, प्रा. एस. के. माने यांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, विज्ञान युगात असे चमत्काराचे दावे केले जातात, हेच पुरोगामी महाराष्ट्राला कमीपणा आणणारे आहे. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असते, ते कारण मानवी बुद्धीला समजते. संबंधित जाधव यांनी चमत्कार तपासणीची परवानगी दिली, तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्यामागचे कारण, विज्ञान लोकांना सांगू शकेल. जाधव यांनी त्यासाठी सहकार्य करावे.

महाराष्‍ट्रात गत दहा वर्षांपासून महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा आहे. या कायद्याच्या कलम २ नुसार ‘एखाद्या व्यक्तीने तथाकथित चमत्कारांचा प्रयोग प्रदर्शित करून त्याद्वारे आर्थिक प्राप्ती करणे आणि अशा तथाकथित चमत्कारांचा प्रचार व प्रसार करून लोकांना फसवणे, ठकवणे आणि त्यांच्यावर दहशत बसविणे’ हा दखलपात्र गुन्हा आहे. या जादूटोणाविरोधी कायद्यानुसार त्या भागातील पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हे या कायद्याचे दक्षता अधिकारी म्हणून काम करीत असतात.

या दक्षता अधिकाऱ्यांनी संबंधित चमत्काराची सत्यता पडताळून पाहावी, तथाकथित चमत्कार घडवून दिशाभूल केली असल्यास संबंधितावर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा. पुरोगामी विज्ञानवादी महाराष्ट्रात असे कथित चमत्कार दाखवून जनतेची दिशाभूल करणे हे अत्यंत निषेधार्थ आहे. अशा तथाकथित चमत्कारावर जनतेने विश्वास ठेवू नये. गणपतीच्या मूर्तीच्या डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंची अफवा सकाळी वाऱ्यासारखी गावात व परिसरात पसरल्याने कोकरूड, मोरेवाडी खुजगाव, शेडगेवाडी व अन्य गावाहून गणपती पाहण्यासाठी जाधव यांच्या घरी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT