Sangli Ganeshotsav lavani Dance esakal
Ganesh Chaturthi Festival

Sangli : गणेशोत्सवात लावणीची बरसात; 'या रावजी, बसा भाऊजी'ला सांगलीकरांचा उदंड प्रतिसाद, पारंपरिक लावण्यांनी वेधलं लक्ष

विजयंत मंडळातर्फे लावणीचे आयोजन केले होते.

सकाळ डिजिटल टीम

नम्रता पाटीलने सलामी दिल्यानंतर पारंपरिक बैठकीच्या ‘या रावजी, बसा भाऊजी’ लावणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

सांगली : लावणीसाम्राज्ञी नम्रता पाटील व अर्चना जावळेकर यांच्या तुफान अदा (Lavni Dance), त्यात पावसाची दमदार हजेरी, तरीही रसिकांची झालेली गर्दी, यामुळे मारुती चौकात लावणीची बरसात अनुभवायला मिळाली. एकाहून एक पारंपरिक लावण्यांनी रंगत आणली.

विजयंत मंडळातर्फे आयोजन केले होते. विसर्जन मिरवणूक (Ganpati Visarjan Miravnuk) जंगी झाली. पारंपरिक वाद्यांचा दणदणाट, मुखवट्यांसह पारंपरिक खेळ, सांगलीकरांची उदंड गर्दी व त्यात पाऊस असे वातावरण होते. तरुण भारत क्रीडांगणावर नियोजन होते.

सलग दोन दिवसांच्या पावसाने चिखल झाल्याने ऐनवेळी मारुती चौकात कार्यक्रम घ्यावा लागला. चौक रसिक प्रेक्षकांनी भरला होता. महिलांची गर्दी लक्षणीय होती. मंडळाचे नेते पृथ्वीराज पवार, गौतम पवार, अध्यक्ष विलास शिंदे यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी धावपळ करत होते. रात्री उशिरापर्यंत कार्यक्रम रंगला. नम्रता पाटीलने सलामी दिल्यानंतर पारंपरिक बैठकीच्या ‘या रावजी, बसा भाऊजी’ लावणीला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, नवव्या दिवशी मंडळांच्या मिरवणुका उशिरा सुरू झाल्या. पावसाचा परिणाम जाणवला. सायंकाळी सातच्या सुमारास पाऊस सुरू झाला. वाद्ये झाकून ठेवावी लागली. ढोल-ताशा पथक, झेंडे नाचवणारे पथक, हलगी, झांज पथकांची तीच अवस्था होती.

वाद्यांनी सांगलीकरांचे लक्ष वेधून घेतले. आवाजाच्या भिंती, अर्थात साऊंड सिस्टिमपेक्षा पारंपरिक वाद्यांना सांगलीकरांनी अधिक पसंती दिली. अशी पथके जिथे, तिथे गर्दी होती. गणपती पेठ, कापडपेठ, हरभट रस्ता, मारुती रस्ता येथे नागरिक थांबले होते. मिरवणुकीचे स्वागत करत होते. रात्री नऊनंतर गर्दी वाढत गेली.

कणसे यांना मदतीचा धनादेश

एरंडोली (ता. मिरज) येथील चंद्रकांत कणसे यांच्या कुटुंबाला विजयंत मंडळातर्फे पृथ्वीराज पवार यांच्या हस्ते मदतीचा धनादेश देण्यात आला. मंडळाने यंदा दहीहंडी कार्यक्रम केला नाही. तीच बचतीची रक्कम टंचाईच्या संकटात व गरजवंतांना दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: चीन अन् रशियाकडून अणुचाचण्या सुरु असल्याचा ट्रम्प यांचा दावा; पाकिस्तानचंही घेतलं नाव, चीनकडून प्रत्युत्तर

Jaipur Accident: भीषण अपघात! डंपरची ४० वाहनांना धडक; ५० जणांना चिरडलं, ११ लोकांचा जागीच मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

World Youngest Billionier : वयाच्या 22 व्या वर्षी अब्जाधीश! भारतीय वंशाच्या दोन तरुणांसह तीन मित्रांची अविश्वसनीय कामगिरी

Nashik News : कोवळ्या वयासाठी 'बोल्ड' विषय नको! नाट्य संघांच्या मागणीनुसार हौशी मराठी नाट्यस्पर्धेत लहान मुलांना प्रवेश नाही

Dev Deepawali 2025 Travel Tips : देव दिवाळीला वाराणसीला जाऊ शकत नाही? मग भेट द्या 'या' अद्भुत ठिकाणांना

SCROLL FOR NEXT