food  sakal
Ganesh Chaturti Festival

Ganesh Chaturthi 2023 : खमंग अन् गोड! गणेश चतुर्थीला 'हे' पाच खास पदार्थ बाप्पासाठी बनवून उत्सव साजरा करा

दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात सुरू होतो.

Aishwarya Musale

दरवर्षी गणेश उत्सव मोठ्या थाटामाटात सुरू होतो. गणेश चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेशाचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी होणार असून, त्याची तयारी बाजारपेठा आणि घरांमध्ये सुरू झाली आहे.

तसेच या दिवसांमध्ये अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यापैकी पाच खास पदार्थ आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पुरण पोळी

हा महाराष्ट्रात बनवला जाणारा पारंपारिक गोड पदार्थ आहे. पुरण पोळीचे अनेक प्रकार केले जातात, पण प्रामुख्याने हरभरा डाळीपासून बनवलेली पुरण पोळी अधिक लोकप्रिय आहे.

खजूरचे लाडू

खजुराचे लाडू खूप चवदार आणि ऊर्जा देणारे असतात. हे देखील विशेषतः गणेश चतुर्थीला बनवले जातात. खजूरमध्ये ग्लुकोज, पोटॅशियम आणि अनेक जीवनसत्त्वे असतात जे खूप फायदेशीर असतात.

शिवाय, ते बनवणे देखील खूप सोपे आहे. यासाठी खजूर धुऊन वाळवले जातात. नंतर त्याचे लहान तुकडे करून बिया काढून टाकल्या जातात. आता हे तुकडे मिक्सरमध्ये घालून बारीक बारीक करून तळून लाडू बनवतात.

मलाई पुरी

मलाई पुरी, ज्याला मालपुआ देखील म्हणतात, हा एक पारंपारिक पदार्थ आहे. मलई पुरी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या चवीने आणि वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. मैदा किंवा पिठात साखर घालून पाणी किंवा दुधाच्या मदतीने द्रावण बनवतात.वेलची बारीक करून या द्रावणात मिसळल्याने सुगंध तर येतोच पण चवही वाढते.

केशर श्रीखंड

हे गुजरात आणि महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध स्वीट डिश आहे. दह्यामध्ये केशर मिसळल्यास ते केशर श्रीखंड बनते जे चविष्ट तर असतेच पण आरोग्यासाठीही चांगले असते. दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रिबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन बी चांगल्या प्रमाणात असते. यामुळे पचनशक्ती मजबूत होते. तसेच हाडे आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.

खसखसचा हलवा

अनेक ठिकाणी गणपतीला खसखसचा हलवा अर्पण करण्याची परंपरा आहे. तुम्ही घरी सहज बनवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT