ganesh-festival

Ganesh Festival : नाट्य-पुस्तक-वृक्षात साकारला पर्यावरणस्नेही गणपती

ज्ञानेश्वर भंडारे

वाल्हेकरवाडी(पुणे) : ज्या पुस्तकांच्यामुळे आपली बुद्धी तल्लख होत गेली ज्ञान वाढलं आणि आपल्याला माणूसपण लाभलं त्याच पुस्तकातून गणपती चिंचवड येथील प्रभाकर पवार आणि त्यांच्या पत्नी अमृता पवार यांनी साकारला आहे.

शिवाय पुस्तकं वा ग्रंथ निर्मितीसाठी जो कागद वापरला जातो, तो ज्या झाडांपासून मिळतो त्या झाडांच आपण संवर्धन करायला हवंय हे ज्ञान ज्या ग्रंथ वा पुस्तकातून मिळतं याचं प्रतिक म्हणून या बुद्धीच्या ग्रंथातूनच झाड उगवल्याची संकल्पना पवार दाम्पत्यांनी या निसर्ग देखाव्यातून साकारली आहे. म्हणून याला नाट्य-पुस्तक-वृक्ष असे नाव देण्यात आले आहे. या वृक्षांची उंची 8 फूट असून, हा साकारताना 2 दिवसाचा कालावधी लागला आहे. या देखाव्याला बनविण्यासाठी अगदी माफक 200-250 रु. खर्च आला आहे. 

''हा देखावा साकारताना यामध्ये कशाही प्रकारे, प्लास्टिक, थर्माकॉल वा अशा कोणत्याचं घटकांचा समावेश केलेला नाही ज्याच्यामुळे निसर्गाची हानी होईल. तर हा देखावा संपूर्णतः पर्यावरण स्नेही करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.त्यावर जी नावं वा अक्षरं कोरली आहेत ती म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून आ ‘थिएटर वर्कशॉप कंपनी’च्या माध्यमातून अनेक एकांकिका, बालनाट्य, दिर्घांक आणि नाटकांची आजवर रंगमंचावर साकारलेली परंपरा मांडली आहे''.

- प्रभाकर पवार, चिंचवड. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

CM Devendra Fadnavis: उद्योगांत महाराष्ट्र अव्वलच, 'कंपन्या बंद'चा दावा चुकीचा; फडणवीस यांचा विश्वास

आज शूटिंगचा शेवटचा दिवस... झी मराठीची मालिका अवघ्या ७ महिन्यात घेणार निरोप; मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना धक्का

Dangerous River Stunts: पावसाळ्यात अशी चूक करू नका! खवळलेल्या नदीत ३ तरुणांची जीवघेणी स्टंटबाजी; पोलिसांचा VIDEO VIRAL

IND vs SL 1st Test: परदेशात फडकला तिरंगा, राष्ट्रगीताने भारावलं गॉलचं मैदान; शुभमन गिलसह टीम इंडियाचा VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT