pali 
ganesh-festival

चिमुकल्या हातांनी साकारले पर्यावरणपूरक मातीचे गणपती

अमित गवळे

पाली - लहानग्यांनाच जर पर्यावरण स्नेही व पर्यावरण पूरक गणेशोत्सवाचे महत्व पटवून दिले तर आपोआपच पुढची पिढी पर्यावरणाप्रती अधिक सजग होईल. या उद्देशानेच येथील इको फ्रेंडली आर्ट कॅफे बीबीएमच्या तरुण व्यवस्थापीका सुरभी मोरे यांनी नुकतीच लहानग्यांसाठी येथे मातीचे गणपती बनविण्याची कार्यशाळा आयोजित केली. या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शक नेहा तारकर देशमुख आणि अभिषेक देशमुख यांनी तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत लहान मुलांनी स्वतः मातीच्या सुबक गणेश मूर्ती तयार केल्या. यावेळी मातीची (सिरॅमिक) भांडी तयार करण्यासाठी वापरली जाणारी माती गणेश मूर्ती बनविण्यासाठी वापरली गेली. पालीत बहुदा अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम असल्याचे अभिषेक देशमुख यांनी सकाळला सांगितले. तर नेहा तारकर देशमुख म्हणाल्या की लहान मुलांनी बनविलेल्या ह्या गणेश मूर्ती ते आपल्या घरी घेवून गेले आहेत. आपल्या घरातल्या मूर्ती बरोबर ही मूर्ती मुले स्थापणार आहेत. आणि त्याबरोबरच घरी येणार्यांना पर्यावरण पूरक मातीच्या गणेश मूर्तिंची गरज व महत्व सांगणार आहेत. तर कॅफे बीबीएमच्या तरुण व्यवस्थापिका सुरभी मोरे म्हणाल्या की पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यकते उपक्रम आमच्या पर्यावरण स्नेही कॅफे मार्फत राबविले जातात. या उपक्रमात लहानमुले अगदी हरपुन गेली होती. त्यांनी खूप आनंदाने मातीच्या गणेश मूर्ती बनविल्या आणि सोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देखील दिला. या उपक्रमास स्वराज मोरे यांचे सहकार्य लाभले
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Dattatraya Meghe Passes Away: लोकसेवेचा वटवृक्ष निमाला! माजी खासदार, लोकनेते दत्ता मेघे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, विविध क्षेत्रात हाेता दबदबा..

Pune Accident: पुण्यातील मुथाळणे घाटात शेतमजूरांची पिकअप पलटली; एक गंभीर तर १८ किरकोळ जखमी!

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT