ganesh-festival

गर्दीच्या दिवशी "आवाज वाढव डीजे' 

सकाळवृत्तसेवा

पुणे - गणेशोत्सवात कमी गर्दी होणाऱ्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धक वापरण्यास परवानगी देण्याची चूक अखेर जिल्हा प्रशासनाने दुरुस्त केली. आता गौरी विसर्जनानंतर उसळणाऱ्या सातव्या, नवव्या आणि दहाव्या तसेच विसर्जनाच्या बाराव्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यात आली आहे. 

जिल्हा प्रशासनाच्या आधीच्या निर्णयानुसार दुसऱ्या, पाचव्या, सातव्या आणि बाराव्या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. मात्र, दुसरा आणि पाचवा दिवस फारसा गर्दीचा नसतो. त्यामुळे आता गर्दी उसळणाऱ्या दिवसांचा समावेश त्यात करण्यात आल्याने पुणेकरांना उत्सवाचा आनंद मोठ्या प्रमाणावर लुटता येईल. 

राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या "ध्वनिप्रदूषण नियमन व नियंत्रण नियम, 2000', च्या कलम 5 (3) नुसार ध्वनिवर्धकच्या वापरासंदर्भात "आवाजाची मर्यादा' राखून सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंतची सूट देण्यात आली आहे. 

जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशानुसार, यंदाच्या वर्षी गणशोत्सवामध्ये गौरी विसर्जनाचा सातवा दिवस (ता.31), नववा दिवस (ता.2 सप्टेंबर), दहावा दिवस (ता.3 सप्टेंबर) तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी (बारावा दिवस) सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यात आली आहे. 

ध्वनिवर्धक वाजविण्यासाठीचे नियम व अटी ः 
- निर्धारित चार दिवसांमध्ये सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत परवानगी 
- ध्वनी प्रदूषण नियम, 2000 नुसार विहित ध्वनी मर्यादेत ध्वनिवर्धक वाजविणे बंधनकारक 
- "झोनिंग'प्रमाणे ठरलेल्या मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवू नये 
- ध्वनीचे शोषण करणारे विशिष्ट लाकडी सामग्री आवश्‍यक त्या ठिकाणी लावणे बंधनकारक 
- शांतता क्षेत्रात ही परवानगी लागू असणार नाही, त्या ठिकाणी ध्वनिवर्धक वाजविण्यास बंदी कायम 

आणखी एक दिवस मिळण्याची शक्‍यता 
ध्वनिवर्धकांना परवानगी देण्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर वर्षातील 15 दिवसांचे अधिकार दिले आहेत. त्यापैकी अन्य धार्मिक सणांमध्ये पाच दिवसांची परवानगी दिली आहे. त्यामुळे उर्वरित दहा दिवसांपैकी चार दिवसांची परवानगी दिली आहे. त्यामध्ये नवरात्री उत्सवाचे दोन दिवस, दिवाळीचा एक दिवस, ख्रिसमसचा एक, 31 डिसेंबरचा एक या दिवसांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त आणखी एक दिवस राखीव आहे. आवश्‍यकता भासल्यास हा दिवस देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी निर्णय देऊ शकतात. त्यामुळे आणखी एक दिवस मिळण्याची शक्‍यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी' वितरणाबाबत महाराष्ट्र सरकारचे आदेश; कोणाला किती गॅस मिळणार? यादी आली समोर

Ancestors Findings : आजोबा-पणजोबा-खापर पणजोबा-लकडपणजोबा-परपणजोबा...घरबसल्या वंशावळ कशी शोधायची? वाचा एकदम सोपी पद्धत

"मी त्याला अभिनय शिकवलाय..." क्राईम पेट्रोल फेम अभिनेत्याने केलं अक्षय खन्नाचं कौतुक ; "कोणत्याही भूमिकेत.."

Gas Cylinder Shortage : बारामतीत सोमवारपासून सिलिंडरअभावी परिस्थिती गंभीर होण्याची भीती....

Bhimashankar Temple : सर्वांसाठी नियम वेगळे; भाजप नेत्यासाठी वेगळे? भाविकांना अडवले, खासदाराला प्रवेश; भीमाशंकर मंदिरात वाद

SCROLL FOR NEXT