ganesh-festival

दोनशे वर्षांच्या ‘चोर’ गणपतीची प्रतिष्ठापना  

सकाळवृत्तसेवा

सांगली - सांगली संस्थानचे श्री गणेश मंदिर आणि दरबार हॉलमधील गणेशोत्सवाची परंपरा २०० वर्षांची आहे. दररोजची पूजा-अर्चा आणि सेवा परंपरेने सुरू आहे. घोडे, उंटासह निघणारा छबिना, दररोजची गायनसेवा आणि रात्रीची गस्त अशी वैशिष्ट्ये आहेत. ‘चोर’ गणपतीची प्रथा पूर्वांपार आहे. आज भाद्रपद शुद्ध प्रतिपदेनिमित्त ‘चोर’ गणपतीची प्रतिष्ठापना भक्तिभावाने झाली. पाच दिवस उत्सव आहे. 

गणेशनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीतील श्री गणपती पंचायतन संस्थानचा गणेशोत्सव, मात्र प्रतिपदेलाच (चतुर्थीच्या तीन दिवस आधी) सुरू होतो. त्यामुळे गणपती केव्हा आले अन्‌ गेले त्याचा सांगलीकरांना पत्ताच लागत नाही. म्हणूनच चोर पावलांनी येणाऱ्या विघ्नहर्त्याला ‘चोर गणपती’ म्हणण्याची प्रथा  रूढ झाली असावी, अशी माहिती मुख्य पुजारी अशोक  पाटणकर आणि रमेश पाटणकर यांनी ‘सकाळ’ शी  बोलताना दिली. 

श्री. पाटणकर म्हणाले, ‘‘२५ ऑगस्टला श्री गणेश चतुर्थी आहे. पण पंचायतनचा गणपती उत्सव भाद्रपद  शुद्ध प्रतिपदा (२२ ते २७ ऑगस्ट) दरम्यान आहे. आज प्रतिपदेला पहाटे पाच वाजता पारंपरिक पद्धतीने ‘चोर’ गणपतीची प्रतिष्ठापना झाली. साडेतीन फुटांच्या दोन मूर्तींची प्रतिष्ठापना होते. विशेष बाब म्हणजे दोनशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यापासून (इको फ्रेंडली) मूर्ती तयार करण्यात आली होती. तेव्हापासून आहे तशी आहे. 

रंगरगोटीशिवाय अन्य कोणतेही काम केले जात नाही. मुख्य मूर्तीच्या डाव्या-उजव्या बाजूला दोन्हीही मूर्ती बसवण्यात येतात. गणेशभक्तांना हात लावून दर्शन घेता येते. गणेशोत्सवानंतर मूर्ती सुरक्षित स्थळी ठेवण्यात येतात.’’ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT