ganesh-festival

Ganesh Festival : रस्त्यांवर गणेशभक्तांची मांदियाळी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - बाप्पाला पुष्पहार, फुले, दूर्वा आणि नारळाचे तोरण अर्पण करण्याबरोबरच "श्रीं'चे दर्शन घेण्यासाठी रविवारी सकाळपासून शहरात बाहेरगावांहून व उपनगरांतून गणेशभक्त येत होते. त्यामुळे मध्यवर्ती भागातील रस्त्यारस्त्यांवर दिवसभर गणेशभक्तांची मांदियाळी दिसत होती. रात्री उशिरापर्यंत पेठांचा भाग गर्दीने गजबजून गेला होता. 

गणेशोत्सवाला सुरवात होऊन पहिलाच रविवार आल्याने चाकरमान्यांनी गणेशदर्शनाबरोबरच देखावे पाहण्याचा आनंद लुटला. मानाच्या पाचही गणपतींना अनेक भाविकांनी नारळाचे तोरण अर्पण केले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या "श्रीं'स नारळाचे तोरण वाहण्यासाठी 
भाविकांची रांग दुपारी बारापर्यंत बुधवार चौकापर्यंत गेली होती. रात्री उशिरापर्यंत दगडूशेठ हलवाई गणपती, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती व अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाचे दर्शन घेण्यासाठी भाविक येत होते. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भाग गर्दीने फुलून गेला होता. 

शहरातील विविध रस्त्यांवर सायंकाळनंतर तरुणाई "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया'चा जयघोष करत होती. शहराच्या पूर्व व पश्‍चिम भागाला जोडणारा शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्त्यासह सदाशिव पेठ, नारायण पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठ, रविवार पेठ, मंगळवार पेठ, सोमवार पेठ, नाना पेठ, गणेश पेठ, रास्ता पेठ, गंज पेठ, भवानी पेठ, घोरपडे पेठ, नवी पेठ व कसबा पेठ 
परिसरातील पौराणिक, सामाजिक, ऐतिहासिक, विज्ञान तसेच विद्युत रोषणाईचे देखावे पाहण्यासाठी नागरिक रात्री उशिरापर्यंत येत होते. 

भाविकांच्या सुरक्षेसाठी  मंडळांकडून उपाययोजना 
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विविध मंडळांचे कार्यकर्ते आवश्‍यक त्या उपाययोजना करत होते. देखावे पाहून थकलेल्या भाविकांची पावले खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सकडे वळत होती. नागरिक लहानग्यांसाठी खेळणी उत्साहाने खरेदी करत होते. देखावे पाहण्याचा क्षण अनेक जण मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होते; तसेच देखाव्यांचे व्हिडिओ काढून आपल्या आप्तस्वकीयांसहित मित्रमैत्रिणींना पाठवित होते. 

मी माझ्या कुटुंबीयांसमवेत मांजरीहून देखावे पाहण्यासाठी आलो आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात आल्याशिवाय गणेशोत्सवाचा व देखावे 
पाहण्याचा आनंद मिळत नाही. तो आनंद प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी आज आलो आहे. 
-सुनील यादव, स्थापत्य अभियंता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT