ganesh-festival

Ganesh Festival : मंगलमय आनंदपर्वाला सुरवात

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात, डीजे व डॉल्बीला फाटा देत ढोल- ताशे, सनई, टाळ-मृदंग आणि लेझीमच्या गजरात जिल्ह्यात ठिकठिकाणी गुरुवारी गणरायाचे आगमन झाले. जिल्ह्यातील गणेश मंडळांनी सकाळी नऊपासूनच मिरवणुकीद्वारे गणपती बाप्पाच्या मूर्ती आणत त्यांची प्रतिष्ठापना करण्यास सुरवात केली. दुपारी दीडपर्यंत प्रतिष्ठापनेचा मुहूर्त असल्याने त्यापूर्वी प्रतिष्ठापना करण्यास अनेक मंडळांनी प्राधान्य दिले. 

जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यांच्या ठिकाणांसह मंचर, चाकण, नारायणगाव, आळंदी, जेजुरी, भिगवण, वाघोली, लोणीकंद, घोडेगाव आदी मोठ्या गावांमध्ये गणरायाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शिरूर तालुक्‍यातील न्हावरे येथे आधुनिक पद्धतीच्या सर्व वाद्यांना फाटा देत फक्त टाळ आणि मृदंगांच्या गजरातच गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. याशिवाय आंबेगाव तालुक्‍यातील मेंगडेवाडी येथील पुरातन गणेश मंदिरात परंपरेनुसार कलगीतुरा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 

दरम्यान, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने अष्टविनायकांपैकी जुन्नर तालुक्‍यातील ओझर व लेण्याद्री येथील गणेश मंदिरांमध्ये गणेश जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ओझर येथील श्रींच्या जन्मोत्सवानिमित्ताने मंदिर व गाभारा परिसर आकर्षक फुलांनी सजविण्यात आला होता. लेण्याद्री येथील श्रींच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमाचे आणि कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सुमारे ५० हजार भाविकांनी गिरिजात्मजाचे दर्शन घेतले.

सुमारे हजार गावांत ‘एक गणपती’
पुणे जिल्ह्यात एकूण एक हजार ८६५ गावे आणि वाड्या-वस्त्या आहेत. या सर्व गावांसाठी मिळून एक हजार ४०७ ग्रामपंचायती आहेत. ग्रामपंचायतींचे मुख्यालये असलेल्या अनेक गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. सुमारे एक हजार गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून वर्तविण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Files: अशोक खरातने पाच नरबळी दिल्याचा संशय; सरकारी वकील थेटच बोलले, कोर्टात नेमकं काय घडलं?

Bhandara News: महसूल विभागातील तीन बडतर्फ, तिघे निलंबित; बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळविल्याचे प्रकरण

Latest Marathi News Live Update : बारामतीमध्ये सार्वजनिक शौचलयाच्या सेफ्टी टँकचा स्फोट, महिला आणि दोन चिमुरडे जखमी

"किती ती ओव्हरॲक्टिंग ! " बिग बॉस मराठीचा VIRAL प्रोमो पाहून संकेत-सुपर्णावर प्रेक्षकांनी केली टीका

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

SCROLL FOR NEXT