ganesh-festival

Ganesh festival : देखावे पाहण्याची उत्सुकता

सकाळवृत्तसेवा

पुणे - पावसाने सायंकाळी पुण्यनगरीत दमदार हजेरी लावली, तरीही गणेशभक्तांचा उत्साह दांडगा होता. तशातच मोहरमच्या सुटीमुळे बालगोपाळांना देखाव्यांचा मनसोक्त आनंद लुटता आला. रविवारी (ता. २३) गणेशोत्सवाची सांगता होणार असल्याने मध्यवर्ती भाग नागरिकांनी फुलून गेला होता. सायंकाळी सातनंतर लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्त्यासहित पेठा-पेठांतील अंतर्गत रस्त्यांवर जिकडे तिकडे देखावे पाहण्याचा आनंद घेत रमत-गमत फिरणारे उत्साही गणेशभक्त  दिसत होते. 

गणेशोत्सवाचा गुरुवार हा आठवा दिवस होता. मंगळवार, बुधवारच्या तुलनेत आज भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. उद्या (ता. २१) देखावे पाहण्याचा अखेरचा दिवस असेल, कारण शनिवारी प्रत्येक मंडळाची विसर्जनाची तयारी आणि सत्यनारायणाच्या पूजेसहित विसर्जन रथ सजविण्यात कार्यकर्ते व्यग्र राहतील. त्यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांनीही गुरुवारचा दिवस अन्य मंडळांचे देखावे आणि श्रींचे दर्शन घेण्यासाठी निवडला होता. अप्पा बळवंत चौक, लिंबराज महाराज चौकासहित काही चौकांमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव पोलिसांनी बॅरिकेड्‌स लावले होते. पोलिस मित्रांसह मंडळांचे कार्यकर्तेदेखील पोलिसांना वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सहकार्य करत होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Chatbox As Referee : जेन-झीच्या प्रेमात डिजिटल ट्विस्ट; भांडणं मिटवण्यासाठी AI बनतोय ‘पंच’, पॅचअपसाठी वाढतोय तरुणांचा विश्वास

Latest Marathi News Live Update : युद्धामुळे बंद झालेल्या केळी निर्यातीमुळे नंदुरबार जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत

Thackeray group Kolhapur : कोल्हापुरात ठाकरे गट पुन्हा उभारी घेणार, मोठ्या नियोजनाच्या तयारीत

Satara Politics: साताऱ्यात भाजपचा पुन्हा धक्का! सभापतिपदेही मिळवली; राष्ट्रवादी- शिवसेनेचा बहिष्कार, मंत्री गाेरेंचे वर्चस्व..

Sugar industry: साखर उद्योगाला चालना मिळणार; डिझेलमध्ये ‘बायो-आयसोब्युटेनॉल’ मिश्रणाचा पर्याय, कार्यक्षमतेत कोणतीही तडजोड नाही!

SCROLL FOR NEXT