ganesh-festival

Ganesh Festival : ‘सकाळ’तर्फे स्वच्छतेचा श्रीगणेशा

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहर, आपला परिसर स्वच्छ असावा, असे प्रत्येक पुणेकराला वाटतेच. त्यामुळेच गणेशोत्सवाचे औचित्य साधत सकाळ सोशल फाउंडेशन, सोनाटा गणेशोत्सव व पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे गृहनिर्माण सोसायट्या व काही शाळांमध्ये १५ ते १६ सप्टेंबरदरम्यान स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात पुणेकरांनाही सक्रिय सहभाग नोंदविता येईल. 

शहरातील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमधील सभासद; तसेच शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षक सकाळ स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. यासाठी पुणे महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग स्वच्छतेचे साहित्य उपलब्ध करून देणार आहे. 

ही मोहीम ‘सकाळ सोशल फाउंडेशन’च्या विविध सामाजिक उपक्रमांच्या ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ या मोहिमेचा एक भाग आहे. आपल्यालाही या मोहिमेत स्वयंसेवक म्हणून सहभागी होता येईल. त्यासाठी ‘सोशल फॉर ॲक्‍शन’ वेबसाइटला, फेसबुकला लाइक करणे आवश्‍यक आहे.

स्वच्छता अभियान कधी व कोठे?  
 शनिवार (ता.१५) -
 लुंकड अमेझॉन गृहनिर्माण सोसायटी, सीसीडी चौक, विमाननगर. (वेळ ः सकाळी ८ ते ९) 
 धनेश्‍वर हायस्कूल, धानोरी. (वेळ ः सकाळी ८ ते ९) 
 आनंद विद्यानिकेतन स्कूल, विमाननगर. 
(वेळ - सकाळी ९ ते १०) 
 रविवार (ता. १६) -
 पोलाइट पॅराडाइज, गोल्डन सिटी गृहनिर्माण सोसायटी, माधवनगर, धानोरी. (वेळ - सकाळी १० ते ११) 
 गुरू गणेश नगर गृहनिर्माण सोसायटी, डी. पी. रोड, कोथरूड. (वेळ ः सकाळी ८ ते १०) 
 वृंदावन गृहनिर्माण सोसायटी, डी. पी. रोड, कोथरूड 
(वेळ - सकाळी ८ ते १०) 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT