चिपळूण - उक्ताड भागातील स्वयंभू गणेशमूर्ती चिपळूणकरांसाठी श्रद्धास्थान बनले आहे. गणेशोत्सवानिमित्त येथे धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. चारशे वर्षांपूर्वीचे हे प्राचीन मंदिर असून, थोरले बाजीराव पेशवे हे नेहमी मंदिरात दर्शनासाठी थांबत असत, असा संदर्भ सांगितला जातो.
मंदिरासाठी कार्य करणारे वयोवृद्ध नागरिक मदन वेसवीकरांनी याबाबत माहिती दिली. उक्ताडच्या स्वयंभू गणेशाच्या मूर्ती व मंदिरासोबत अनेक ऐतिहासिक बाबींचा उलगडा होतो. या जुन्या मंदिराचे काम मोडकळीस आले होते. सध्या विलाससेठ खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन मंडळ मंदिराचे व्यवस्थापन करतात. ही गणेशमूर्ती बैठ्या स्थितीत असून, देखणी व आकर्षक आहे. तेव्हापासून माघी उत्सवाचे आयोजन केले जाते. तसेच तीन दिवसांचा गणेशोत्सव साजरा होतो. या गणेशोत्सवातील तीन दिवसांत नारळ घेऊन जाण्याची परंपरा आहे.
त्याशिवाय सांस्कृतिक स्पर्धा, कीर्तन व धार्मिक कार्यक्रमांनी उत्सवाने रंगत येते. कलापथकाचेही कार्यक्रम होतात. दरम्यान, या उत्सवातंर्गत तिसऱ्या दिवशी महाप्रसाद होणार आहे. पालिकेने मंदिराच्या मागील जागेत उद्याननिर्मिती करण्याचे ठरवले आहे.
१९६८ मध्ये मंदिर बांधण्याचा प्रस्ताव
१९६८ मध्ये गावकऱ्यांसमोर मंदिर बांधण्याचा प्रस्ताव ठेवला गेला, पण प्रत्यक्षात १९७३ मध्ये भूमिपूजन झाले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर २१ जानेवारी १९७७ ला उत्सव आयोजित करून नव्या मंदिराचे उद्घाटन केले गेले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.