Ganpati-Murti-Colouring 
ganesh-festival

मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची घाई

सकाळवृत्तसेवा

वडखळ - गणपती बाप्पांचे आगमन अवघे दोन दिवसांवर आले असताना, पेण तालुक्‍यातील गणेशमूर्तींच्या कारखान्यांत मूर्तींवर अखेरचा हात फिरवून त्यांचे स्वरूप सर्वांगसुंदर करण्याची धांदल उडाली आहे. शाडूची माती, रंग, प्लॅस्टर आफ पॅरिस आदी कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तींच्या किमतीही 20 टक्के वाढल्या आहेत.

गणेश चतुर्थीच्या महिनाभर आधीच मूर्तीच्या बुकिंगला सुरवात होते. मूर्तीचे डोळे, दागिने आदी रंगरंगोटीचे काम सध्या सुरू आहे. गणेश मंडळांबरोबर आता घरगुती गणपतींसाठीही नावीन्यपूर्ण मूर्तींना वाढती मागणी आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वच भागांतून शाडूच्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

शाडूच्या मूर्तींच्या किमतीत झालेली वाढ, तसेच त्या हाताळण्यास नाजूक असल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मात्र अजूनही प्लॅस्टर आफ पॅरिसच्या मूर्तींनाच मागणी असल्याची माहिती मूर्तिकारांनी दिली. मूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या सोनेरी, चंदेरी रंगाच्या किमती वाढल्या आहेत. गाजलेले चित्रपट, पौराणिक मालिकांमधील नावाजलेल्या पात्रांच्या रूपांत मूर्ती तयार करून देण्याची मागणी मूर्तिकारांकडे केली जाते. अशा भाविकांनी सहा महिने अगोदर बुकिंग केले आहे. बाहुबली, बाजीराव, जय मल्हार, लालबागचा राजा, दगडूशेठ गणपती, टिटवाळा गणपती, अशा मूर्तींना सध्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

गडब येथील जनार्दन पाटील, शांताराम पाटील यांच्या गणपतींच्या कारखान्यातील शाडूच्या मूर्तींना विशेष मागणी आहे. भक्तांच्या मागणीनुसार तेथे मूर्ती बनविल्या जातात. हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असून, तिसरी पिढी त्यात उतरली आहे. नितीन पाटील, आकीन पाटील, सत्यम पाटील, सुंदरम पाटील, अलंकार पाटील, श्रीयोग पाटील, श्रीतेज पाटील यांनी हा व्यवसाय पुढे सुरू ठेवला आहे.

खड्ड्यांचे विघ्न
पेण तालुक्‍यातील गणेशमूर्तींच्या कारखान्यात सध्या ग्राहकांची गर्दी वाढत आहे. महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे शाडूच्या मूर्तींची वाहतूक करणे अत्यंत कठीण झाले असल्याची तक्रार मूर्तिकार शांताराम पाटील यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB ठरला IPLमधला सर्वात महागडा संघ, नव्या मालकांनी मोजले १६ हजार ७०० कोटी रुपये

उद्धव ठाकरेंची निरोपाच्या भाषणात टोलेबाजी! PM मोदींपासून DyCM शिंदेंपर्यंत, सिलिंडर ते रेडा; कवितेतून मुख्यमंत्र्यांना कोपरखळ्या

वीटभट्टी व्यावसायिकाकडे कारवाई टाळण्यासाठी मागितली लाच, १० हजार घेताना महिला अधिकाऱ्याला अटक

Pimpari News : गॅस टंचाईचा फटका; विद्यार्थ्यांना अर्धपोटी राहण्याची वेळ

क्रीडा अधिकारी ते उप कर्णधार! Rinku Singh कडे कोलकाता नाइट रायडर्सने दिली मोठी जबाबदारी

SCROLL FOR NEXT