ganesh-festival

दगडूशेठ हलवाई गणपतीच्या धार्मिक कार्यक्रमांची रुपरेषा जाहीर

सकाळवृत्तसेवा

पुणे : असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा भाद्रपद गणेशोत्सव सोहळा भाद्रपद शुध्द चतुर्थी (गणेश चतुर्थी) गुरुवार (ता. 13) ते भाद्रपद शुध्द चतुर्दशी (अनंत चतुर्दशी) रविवार (ता. 23) पर्यंत साजरा होणार आहे. 

यानिमित्त दरवर्षीप्रमाणे श्रींच्या उत्सव मंडपामध्ये श्रींच्या उत्सव मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा, महिला अथर्वशीर्ष पठण, गणेशयाग, सहस्त्रपुष्पअर्चना, भाविकांच्या हातून अभिषेक महापूजा व दाक्षिणात्य पद्धतीने विविध प्रकारचे अभिषेक असे धार्मिक विधी होणार आहेत.

या सर्व धार्मिक कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे - 
- गुरुवार (ता. 13) सप्टेंबर (गणेश चतुर्थी) : 

श्रींची आगमन मिरवणूक - श्री दगडूशेठ गणपती मंदिरापासून - 
सकाळी 8:30 वाजता. 

- श्रींच्या उत्सवमूर्तीची प्राणप्रतिष्ठापना परमपूज्य गाणपत्य श्री धुंडीराजशास्त्री पाठक यांच्या हस्ते : 
सकाळी 11:05 मिनिटांनी 

- श्रींच्या उत्सवानिमित्त केलेल्या "तामिळनाडू मधील तंजावर येथील श्री राजराजेश्वर मंदिराच्या" विद्युत रोषणाईचा उद्घाटन सोहळा - सायंकाळी ७ वाजता

- माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील वारकरी बांधवांचा श्री गणेश जागर : रात्री 10 वाजता

- शुक्रवार (ता. 14) :  
ऋषीपंचमी निमित्त हजारो माता - भगिनींचे अथर्वशीर्षपठण : पहाटे 6 वाजता

- गणेशयाग - 
शुक्रवार (ता. 14) ते मंगळवार (ता. 18) : 
सकाळी 9 ते 12 व दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत

- भाविकांच्या हातून करण्यासाठीचे अभिषेक व महापूजा - 14 सप्टेंबर पासून ते 22 सप्टेंबर 2018 -  
सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.

- शनिवार (ता. 15) :
सकाळी 6:15 विद्यार्थी सूर्यनमस्कार               

- मंगळवार (ता. 18) :
सकाळी 6:15  सामूहिक अग्निहोत्र      

अनंत चतुर्दशीच्या दिवशी (ता. 23) रात्री छत्र, चामर, अब्दागिरी सहित हजारो दिव्यांने नटलेल्या "श्री विश्वविनायक रथातून" बाप्पाच्या राजेशाही थाटातील मिरवणुकीचा देदीप्यमान सोहळा संपन्न होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

FDA Crime : ‘क्रीमी डिलाइट’, महावीर डेअरीवर एफडीएची कारवाई; लाखो रुपयांचे पदार्थ आढळले असुरक्षित

Teachers Agitation : सामूहिक रजा घेत शिक्षकांचे आंदोलन; पंचायत समितीवर मोर्चा, पाच तास धरणे आंदोलन, मुख्यालयाची अट शिथिल करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT