These are five special things related to Dagdusheth Ganapati Temple
These are five special things related to Dagdusheth Ganapati Temple 
ganesh-festival

दगडूशेठ गणपती मंदिराबाबत 'या' आहेत पाच खास गोष्टी

सकाळवृत्तसेवा
  • ‘कुली’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना जीवघेणा अपघात झाला होता. त्यावेळी जया बच्चन यांनी दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन नवस केला होता. सुखरूप बरे झाल्यानंतर अमिताभ आणि जया बच्चन यांनी सोन्याचे कान अर्पण केले होते.
     
  • चैत्रमासातील कृष्णपक्षात जी चतुर्थी येते त्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या पंचमीला गणेश मुर्तीला चंदन लेप लावला जातो. या महिन्यात विविध जातीच्या फुलांचा उपयोग गणेश मुर्तीच्या अभिषेकावेळी केला जातो. गेल्या पंचमीला मंदिरात पाच हजार फुलांची आरास करण्यात आली होती. 
     
  • दरवर्षी येणाऱ्या 10 दिवसांच्या गणेशोत्सवाची तयारी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात पाच महिने आधीपासून करण्यास सुरवात होते. भारतातल्या प्राचीन मंदिराचे देखावे उभारणं हे या मंडळाचं वैशिष्ट्य आहे. ज्या लोकांना दूरवरच्या तीर्थक्षेत्राला जाणं होत नाही त्या लोकांना ती मंदिर बघायला मिळावीत हा मंडळाचा उद्देश आहे.
     
  • प्रसिद्ध राजराजेश्वर मंदिराची प्रतिकृती यंदाच्या गणेशोत्सवासाठी उभारली जातेय. प्रसिद्ध कलाकार विवेक खटावर गेल्या अनेक वर्षांपासून हा देखावा साकारण्याचं काम करत असतात.
     
  • ऋषीपंचमीला दगडूशेठ गणपती समोर होणारे महिलांचे सामुहिक अथर्वशीर्ष पठण हा या मंडळाचा आणखी एक लक्षवेधी उपक्रम आहे. गेल्या 40 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. मागील वर्षी यात 27 हजार महिलांनी सहभाग घेतला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलवर नोकरी गमावण्याची वेळ

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT