Dairy Milk Chocolate Modak Recipe:

 

Sakal

ganesh food recipe

Modak Recipe: गणेशोत्सवाच्या दहाव्या दिवशी बाप्पासाठी 10 मिनिटांत बनवा 'डेअरी मिल्क चॉकलेट मोदक', जाणून घ्या रेसिपी

How to make Chocolate Modak for Ganesh Chaturthi 2025 : गणपती बाप्पाला दहाव्या दिवशी डेअरी मिल्क चॉकलेट मोदकचा नैवेद्य दाखून प्रसन्न करू शकता.

Puja Bonkile

गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी बाप्पासाठी १० मिनिटांत डेअरी मिल्क चॉकलेट मोदक बनवा. हे मोदक बनवणे खूप सोपे आहे आणि लहान मुलांनाही आवडेल. गरम पाण्यात चॉकलेट वितळवून मोदक साच्यात टाका आणि त्यात सुकामेवा घाला. थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवा आणि तयार मोदक बाप्पाला अर्पण करा.

Dairy Milk Chocolate Modak Recipe: दहा दिवस आनंद साजरा केला जाणार गणेशोत्सव 6 सप्टेंबरला संपणार आहे. या दिवशी अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. याच दिवशी बाप्पाचे विसर्जन केले जाते. हा गणेशभक्तांसाठी एक भावूक करणारा क्षण असतो. कोणी दीड दिवसानंतर तर कोणी पाच दिवसांनंतर तर कोणी सात दिवसानंतर गणपती विसर्जन करतात.

गणपती बाप्पा जसे ढोल-ताशांच्या गजरात येतात त्याचप्रमाणे निरोप देखील ढोल-ताशांच्या गजरात होतो. बाप्पाला मोदक खुप प्रिय आहे. तुम्ही शेवटच्या दिवशी बाप्पासाठी १० मिनिटांमध्ये डेअर मिल्क चॉकलेट मोदक तयार करू शकता. हे मोदक बनवणे खुप सोपे आहे. हे मोदक लहान मुले देखील तयार करू शकतात. चला तर मग जाणून घेऊया हे मोदक बनवण्यासाठी कृती काय आणि कोणते साहित्य लागते.

डेअरी मिल्क चॉकलेट मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

डेअर मिल्क चॉकलेट- ३ पॅक

गरम पाणी - १ ग्लास

सुकामेवा- बारिक तुकडे

पिस्ताचे - बारिक तुकडे

डेअरी मिल्क चॉकलेट मोदक बनवण्याची कृती

सर्वात आधी एका भांड्यात पाणी गरम करावे.

नंतर गरम पाण्यात डेअर मिल्क चॉकलेटचे पॅक टाकावे.

नंचर हे पॅक गरम झाल्यावर त्यातील चॉकलेट काढून मोदकाच्या साच्यामध्ये टाकावे.

त्यात तुम्ही सुकामेवा किंवा पिस्ताचे बारिक तुकडे टाकू शकता.

मोदक साचा थोडावेळ फ्रिजमध्ये ठेवावे.

नंतर साचा बाहेर काढून त्यातील मोदक काढून घ्यावे.

तयार डेअर मिल्क चॉकलेटचे मोदक बाप्पाला अर्पण करू शकता.

घरातील लहान मुले देखील आनंदी होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? राज्यात भोंदूबाबांची सुळसुळाट, दोन महिन्यात तब्बल ३५ जणांवर कारवाई

POSH Act Maharashtra:‘पॉश कायदा’ अंमलबजावणीसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; अंगणवाडी सेविकांनाही तपासणी अधिकार..

पंजाबसाठी आज 'करो या मरो'! बंगळूरविरुद्ध पराभव झाल्यास पॅकअप; पाहा काय आहे गणित

War Based Marathi Books : विश्वास पाटील यांची ‘द ग्रेट कांचना सर्कस’ कादंबरी; युद्ध, सर्कस आणि माणूस–प्राण्यांच्या संघर्षमय प्रवासाची हृदयस्पर्शी कहाणी

Adhik Maas Guru Pushya Amrit Yog : गुरूचे अलौकिक नक्षत्र भ्रमण; संगणकीय व्हायरसच्या युगात कशी साधाल वैश्विक कनेक्टिव्हिटी?

SCROLL FOR NEXT