Ganesh Visarjan 2025 Sakal
ganesh food recipe

Ganesh Visarjan 2025: गणरायाला आठव्या दिवशी अर्पण करा बिस्किटासारखे खुसखुशीत तळणीचे मोदक, सर्व मनोकामना होतील पुर्ण

Modak Recipe: तुम्हाला बिस्किटासारखे खुसखुशीत तळणीचे मोदक तयार करायचे असेल तर पुढील पद्धतींचा वापर करू शकता. हे मोदक आठ दिवस चांगले राहतील.

पुजा बोनकिले

Talaniche Modak Recipe: हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खुप महत्व आहे. या दिवशी दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन केलं जाते. यंदा ६ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे.

बाप्पाला मोदक, लाल फुल आणि दुर्वा प्रिय आहे. गणरायाला आवडणाऱ्या गोष्टी अर्पण केल्यास बाप्पा प्रसन्न होतात.

आज बाप्पाच्या आगमनाला आठ दिवस पुर्ण झाले आहे. पण अनेक ठिकाणी दिड दिवस तर काही ठिकाणी पाच दिवसांनी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.

तुम्हाला बाप्पासाठी तळणीचे मोदक बनवायचे असेल तर पुढील सोप्या पद्धतीने बनवू शकता. तळणीचे मोदक बनवणे सोपे असून चवदार आहेत. हे मोदक आठ दिवस चांगले राहताता. चला तर मग जाणून घेऊया तळणीचे मोदक बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती कशी आहे.

तळणीचे मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य


गव्हाचे पीठ 1 कप
बारीक रवा 1/2 कप
मीठ 1/4 टीस्पून
कडकडीत तेल 2 टेबलस्पून
पाणी गरजेप्रमाणे

सारणासाठी लागणारे साहित्य


ओल्या नारळाचा चव दिड कप
साजूक तूप 3 टेबलस्पून
बारीक रवा 3/4 कप
दुधाची साय 1/4 कप
दूध 1/2 कप
केशर 10-12 काड्या
पिठी साखर 1 कप
वेलची पूड 1/2 टीस्पून

तळणीचे मोदक बनवण्याची कृती

तळणीचे मोदक बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा थोडे मीठ घालावे.

नंतर गरम तेल टाकावे आणि हाताने चांगले मिक्स करावे.

नंतर पाणी घालून कणीक मळून घ्यावी आणि थोडावेळ झाकून ठेवावी.

नंतर सारण बनवण्यासाठी एका कढईत तूप घालावे आणि रवा मंद आचेवर भाजून घ्यावे.

नंतर नारळाचा खिस टाकून चांगले मिक्स करावे.

नंतर दूधाची साय आणि केशर दूध मिक्स करावे.

नंतर पीठी साखर घालून चांगले मिक्स करावे.

नंतर सुकामेव्याचे तुकडे आणि वेलची पावडर टाका.

कणिक मळून झाले की त्याचे छोटे गोळे करावे.

नंतर छोटी पोळी लाटून घेऊन त्याच्या पाकळ्या करून त्यात सारण भरावे आणि मोदकाचा आकार द्यावा.

नंतर एका कढईत तेल गरम करावे.

नंतर एक एक मोदक तपकिरी होईपर्यंत तळून घ्यावे.

हे तलणीचे मोदक आठ दिवस चांगले राहतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Hamas Ceasefire Broken: ‘’गाझावर पूर्ण ताकदीने हल्ला करा...’’ ; नेतान्याहू यांनी लष्कराला दिले आदेश!

Prashant Kishor Notice : बिहार निवडणुकीआधी प्रशांत किशोर यांना धक्का! ; निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ जसलोक रुग्णालयात दाखल

Deglur News : मराठवाडा साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष बाबू बिरादार यांचे दुःखद निधन; धनगरवाडीत अंत्यसंस्कार

सोशल मीडियावरील घटस्फोटाच्या चर्चा खऱ्या की खोट्या? सौरभपासून वेगळं होण्यावर योगिता चव्हाणने दिली प्रतिक्रिया, काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT