Ganeshotsav 2022 Modak  Esakal
ganesh food recipe

Ganeshotsav 2022: गणपती बाप्पासाठी तयार करा स्पेशल ओरीओ बिस्कीटांचे मोदक

गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना मुलांच्या आवडीचा देखील विचार करा आणि ट्राय करा स्पेशल ओरीओ बिस्कीटांचे मोदक.

सकाळ डिजिटल टीम

गणेशोत्सवात गणपती बाप्पाला मोदकांचा प्रसाद दाखवताना मुलांच्या आवडीचा देखील विचार करा आणि ट्राय करा स्पेशल ओरीओ बिस्कीटांचे मोदक.

गणेशोत्सव 31 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव प्रमाणेच घरोघरी बाप्पाचे आगमन होते. काही लोकांकडे दहा दिवसांचा उत्सव असतो तर काही लोकांकडे पाच किंवा दीड दिवसाचा उत्सव असतो. उत्सव कितीही दिवसांचा असला तरी बाप्पाला प्रिय असणाऱ्या मोदकांच्या प्रसादाशिवाय तो पूर्ण होत नाही. वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवताना त्यात खास स्पेशल ओरीओ बिस्कीटांचे मोदक बनवून पहा. चला तर मग जाणून घेऊ या कसे बनवायचे स्पेशल ओरीओ बिस्कीटांचे मोदक

साहित्य:

● 3 ओरिओ बिस्किटांचे पॅकेट

● 4 चमचे दुधाची क्रीम

● 1 चमचा डेसिकेटेड कोकोनट

● 1/2 चमचा मिल्कमेड / साखर पावडर

कृती:

सर्वप्रथम ओरिओ बिस्कीट घेऊन त्यातलं क्रीम वेगळं व ओरिओ बिस्कीट वेगळे करून त्याचे मिक्सर मधून पावडर तयार करून घेणे. या बिस्किटाच्या क्रीम मध्ये डेसिकेटेड कोकोनट मिल्कमेड किंवा साखर पावडर टाकून सारण तयार करून घ्यावे.आता मिक्सरमध्ये बारीक केलेल्या बिस्किटांच्या पावडर ला दुधाच्या क्रीम ने थोडे थोडे चमच्याने टाकून त्याचा गोळा तयार करून घ्यावा. नंतर त्या गोळ्याचे काप करून त्याचे मोदकासाठी एक सारखे भाग तयार करून घ्यावे.व एक एक गोळा घेऊन हाताने त्याची लाटी तयार करून त्यामध्ये बिस्किटांची काढून ठेवलेल्या क्रीमचे सारण भरावे. आणि सुरेख मोदक तयार करून घ्यावे. मोदकाला पाकळ्या दिसण्यासाठी तुम्ही टुथपिकचा वापर करू शकता.अशाप्रकारे सगळे मोदक तयार करून घ्यावेत. आता आपले ओरिओ बिस्किटांचे मोदक तयार आहेत. तेव्हा बाप्पांना नैवेद्य दाखवून सगळ्यांनी प्रसाद ग्रहण करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : सदाशिव पेठेत जुन्या वादातून एमपीएससी करणाऱ्या तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT