Ganeshotsav 2022 shrikhand recipe  
ganesh food recipe

Ganeshotsav 2022 : गणपतीला नैवेद्यासाठी तयार करा स्पेशल श्रीखंड, पाहा रेसिपी

कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा गणशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

भारताला सणांचा देश म्हटलं जातं. देशातील वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक महिन्यात सण आणि उत्सव साजरे केले जातात. दरम्यान, राज्यात जन्माष्टमी आणि रक्षाबंधनंतर आता अनेकांना गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. सध्या याची जोरदार तयारी दिसून येत आहे. कोरोनानंतर दोन वर्षांनी यंदा हा सण थाटामाटात साजरा केला जात आहे. त्यामुळे नागरिक यंदा गणेशाच्या आगमणाकडे डोळे लावून बसले आहेत. (Ganeshotsav 2022 shrikhand recipe)

गणेशोत्सवाची सुरुवात गणेश चतुर्थीपासून होते. या दिवशी गणेशभक्त बाप्पाची घरी स्थापना करतात आणि दहा दिवस त्याची मनोभावे पूजा करतात. दरम्यान, घरगुती गणपतीचे पाच दिवस घरोघरी अनेक गोड पदार्थ तयार केले जातात. यामध्ये गुलाबजाम, श्रीखंड-पुरी, रसमलाई, खीर असे अनेक पदार्थ त्याच्या नैवेद्यासाठी तयार केले जातात.

श्रीखंड हा गुजरात आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय गोड पदार्थ आहे. अनेकजणांना हा पदार्थ खूप आवडतो. दही, साखर, वेलची आणि केशर घालून ही रेसिपी तयार बनवली जाते. कोणत्याही सणाला घरी आलेल्या पाहुण्यांनाही तुम्ही ही मिठाई देऊ शकता. तर याच श्रीखंडाची रेसिपी कशी तयार करावी हे आपण आज पाहणार आहोत.

श्रीखंड बनवण्यासाठी लागणारे साहित्य-

  • 500 ग्रॅम घट्ट दही किंवा हँग दही

  • 150 ग्रॅम आयसिंग साखर

  • 3 ग्रॅम वेलची पावडर

  • 5 ग्रॅम केशर

  • 2 थेंब गुलाब पाणी

  • 10 मिली (पर्यायी) दूध

  • ड्रायफ्रुट्सचे तुकडे करा

श्रीखंड बनवण्याची पद्धत

श्रीखंड बनवण्यासाठी प्रथम केशर १० मिली दुधात भिजत टाका. यानंतर सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करून एका भांड्यात ठेवा. आता नट आणि ड्रायफ्रुट्सने सजवा. तुमचे चविष्ट श्रीखंड तयार आहे. तुम्ही हे गणपतीला नैवद्य म्हणून चढवू शकतो. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या फ्लेवरचे श्रीखंड मिळतात. मात्र ही रेसिपी वापरुन तुम्ही घरीच अगदी सोप्या पद्धतीने श्रीखंड बनवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT