Kaju Malpua Recipe Esakal
ganesh food recipe

Kaju Malpua Recipe: घरच्या घरी भन्नाट लागणारा काजू मालपुआ कसा तयार करायचा?

गणेशोत्सवाच्या काळात अनेक घरात आवर्जून मिठाई बनवली जाते. यामध्ये काजू मालपुआ हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.

दिपाली सुसर

गणेशोत्सवाच्या काळात अनेक घरात आवर्जून मिठाई बनवली जाते. यामध्ये काजू मालपुआ हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हे बनवण्यासाठी तुम्हाला फक्त मैदा, काजू पीठ, रवा, साखर आणि दूध यासारख्या काही सामानाची आवश्यकता आहे. सणासुदीला बाजारातून मिठाई विकत घेण्याऐवजी तुमच्या मित्रपरिवारासाठी आणि घरच्यांसाठी ही मिठाई बनवू शकता. चला,तर मग ही टेस्टी मिठाई कशी बनवायची ते या लेखात सविस्तर जाणून घेऊयात..

साहित्य:

● एक वाटी मैदा

● अर्धा वाटी काजू पीठ

● दोन वाटी दूध

● तूप

● अर्धा वाटी रवा

● हिरवी वेलची पूड

● अर्धा वाटी पिठीसाखर

काजू मालपुआ बनवण्याची कृती:

एका मोठ्या भांड्यात सर्व मैदा, रवा, साखर, काजूचे पीठ आणि वेलची पूड घालून सर्व मिश्रण मिक्स करावे.

नंतर या मिश्रणात दूध घालुन पिठात चांगले एकजीव मिसळावे. इथे एक गोष्ट निट लक्षात घ्यावी गुठळ्या होऊ देऊ नकात.

नंतर हे मालपुआ तळण्यासाठी पॅनमध्ये थोडेसे देशी तूप गरम करा. आता गरम तुपाच्या मध्यभागी एक चमचा पिठ घालावे. कढईत तुपात टाकलेले पिठ हे गोल आकारात पसरवे. मालपुआ दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी रंगाचे होईपर्यंत तळा.तुम्ही मालपुआ जसेच्या तसे सर्व्ह करू शकता किंवा जर तुम्हाला ते गोड बनवायचे असतील तर ते साखरेच्या पाकात बुडवून घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केमिकल कंपनीत अग्नितांडव, ८ कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू; लागोपाठ स्फोट अन्...

Abu Salem : सुप्रीम कोर्टाने अबू सालेमला फटकारले, याचिक रद्द करत म्हटले- " टाडा अंतर्गत सजा मिळालीय, समाजाचं भल केलं म्हणून नाही"

Local Train: दिवसभरात १,४१४ लोकल फेऱ्या अन्...; गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेचा दिलासादायक निर्णय

Latest Marathi News Update : नांदेडमध्ये १७ वर्षीय युवकाचा रेड्याच्या टकरीत मृत्यू

अजितदादांच्या निधनानंतर त्याच दिवशी मंत्रालयातून ७५ शाळांना अल्पसंख्यांक दर्जा; एकाच संस्थेच्या २८ शाळा

SCROLL FOR NEXT