सलग दुसऱ्यावर्षी कोरोना संसर्गामुळे गणेशोत्साव साधेपणाने साजरा केला जात आहे. उत्साही आणि मंगलमयी वातावरणात गणरायचे भक्तांच्या घरी आगमण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही काही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या घरी उत्साहाने बाप्पाचे स्वागत केले जात आहे. पाहू या बॉलीवूड सेलिब्रिटींचा बाप्पा..
अभिनेत्री सारा अली खान हिच्या घरी देखील गणेशाची स्थापना झाली आहे. सार आणि तिची आई अमृता सिंह यांनी बाप्पासोबत फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केलाआहे. अभिनेत्री श्रध्दा कपूर हीने दरवर्षीप्रमाणे यंदा गणेशाची स्थापना केली आहे. लाडक्या बाप्पासोबतचा फोटोही श्रध्दाने शेअर केला आहे. अभिनेत्री सोहा अली खान हिने तिच्या मुली सोबत छोटी बाप्पाची मुर्ती बनवली. तिच्या मुलीसोबतचा फोटो शेअर केला आहे. अभिनेता नील नितीन मुकेश यांनेही दरवर्षीप्रमाणे उत्साहात कुटुंबासोबत गणरायाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. नीलने त्याच्या कुटुंबासोबत गणेशोत्सव साजरा करतानाचे काही फोटो देखील शेअर केले आहे. अभिनेत्री अन्यना पांडे हिच्या घरी देखील गणपती बाप्पाचे आगमण झाले आहे. अन्यनाने बाप्पासोबतच फोटो शेअर केला आहे.अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) दरवर्षी घरी उत्साहात गणपती बाप्पाचे स्वागत करते. यावर्षी शिल्पाने तितक्याच उत्साहात बाप्पाच्या स्वागत करत गणेशोत्सव साजरा करत आहे. पती राज कुंद्रा याला अटक झाल्यामुळे शिल्पाच्या कुटुंब सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. अशा कठीण काळातही शिल्पा गणरायाला आपल्या घरी आणून मनोभावे पूजा करत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही शिल्पाने लालाबागच्या राजाची प्रतिकृती स्थापन करुन गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे.अभिनेता अजय देवगण यांने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. दर्शन घेतानाचा फोटो अजयने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.बीग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांचे चाहते आणि गणेश भक्तांना इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता सोनु सुद याच्या कडे दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पाचे आगमण झाले आहे. गेल्या 21-22 वर्षांपासून त्याच्याकडे गणेशाची स्थापना केली जाते. अभिनेत्री माधुरी दिक्षित सध्या 'डान्स दिवाने शो' जज करत आहे. या शोच्या सेटवर गणरायची पुजा करतानाची पोस्ट माधूरीने शेअर केली आहे.
बॉलीवूडमधील फेमस कपल करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या घरी देखील गणरायचे आगमण झाले आहे. करीना आणि सैफने तैमुरसोबत बाप्पाची पुजा करतनाचा फोटो शेअर केला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.