गौरी-गणपतीकरिता अनारकली, चंद्रकला मोदकांची मोठी रेंज!
गौरी-गणपतीकरिता अनारकली, चंद्रकला मोदकांची मोठी रेंज! Canva
गणेशोत्सव फोटो स्टोरी

गौरी-गणपतीकरिता अनारकली, चंद्रकला मोदकांची मोठी रेंज!

प्रकाश सनपूरकर

गौरी- गणपती सणासाठी मिठाईचा बाजार फुलला आहे. केशर, पिस्ता, मलाई, चॉकलेट, गुलकंद, मावा आदी मोदकांचे प्रकार उपलब्ध करण्यात आले आहेत.

सोलापूर : गौरी- गणपती सणासाठी (Ganesh Chaturthi) मिठाईचा बाजार फुलला आहे. कोरोनाचे (Covid-19) सावट गेल्याने बाजारात ग्राहकांचा उत्साह वाढलेला आहे. त्यामुळे उलाढालदेखील अधिक होणार आहे. खाद्यतेलाचे भाव मागील काही महिन्यांपासून वाढलेले आहेत. त्याचा परिणाम झाला आहे. साखरेचे भाव काही प्रमाणात वाढलेले आहेत. दुधाचे भाव आणि खव्याचे भावही वाढल्याने मिठाईचे दर वाढविण्याशिवाय मिठाई विक्रेत्यांसमोर पर्यायच राहिला नाही. गौरींसाठी मोठ्या प्रमाणात फराळाच्या पदार्थांची विक्री सुरू झाली आहे.

गौरी- गणपती सणासाठी मिठाईचा बाजार फुलला आहे. केशर, पिस्ता, मलाई, चॉकलेट, गुलकंद, मावा आदी मोदकांचे प्रकार उपलब्ध करण्यात आले आहेत. गौरींसाठी चकली, करंजी, चरोटे यांसारखे अनेक खाद्यप्रकार तयार स्वरूपात बाजारात दाखल झाले आहेत.
अनारकली, चंद्रकला या विशेष मिठाईचे ग्राहकांना आकर्षण आहे. गणेशोत्सवात सर्वाधिक मागणी ही मोदकांना असते. मोदकांच्या अनेक प्रकारांना बच्चे कंपनीची मोठी पसंती असते. विशेषतः चॉकलेट मोदकांची मागणी जास्त असते. याशिवाय नेहमीप्रमाणे लाडू, पेढे, गुलाबजामून, जिलेबी, इमरती, काजूकतली अशा अनेक मिठायांनी बाजार फुलून गेला आहे.
करंजी, चकली, अनारसे, रंगीत शंकरपाळे, बेसन लाडू, रवा लाडू आदी अनेक गौरीपूजनात वापरले जाणारे गोडधोड पदार्थ तयार स्वरूपात मिळत आहेत.
साखरेपासून बनवलेले पदार्थ अनेकवेळा कडक होतात. तसेच गुळाच्या मिठाईचा गोडवा वेगळ्या पद्धतीचा असतो. त्यामुळे पांरपरिक पद्धतीने गुळापासून बनवलेल्या मिठायाची मागणीदेखील वाढत आहे. त्यामुळे मिठाई विक्रेतेदेखील गुळाच्या पदार्थांची विक्री करण्यासाठी आधीपासून तयारी करत असतात. मिठाई बाजारात आता अतिगोडपेक्षा कमी गोड व नैसर्गिक चव जपणारे पदार्थ निवडण्याचा चोखंदळपणा ग्राहकांकडून दाखवला जात आहे.
मागीलवर्षीपेक्षा अधिक चांगली विक्री यावर्षी होण्याचा अंदाज आहे. कोरोनाचे सावट गेल्याने ग्राहकाची खरेदी वाढली आहे. त्यामुळे फेस्टिव्हल सीझनची सुरवात चांगली झाली आहे.
गौरी सणासाठी गोडधोड पदार्थ तयार स्वरूपात उपलब्ध

ठळक बाबी

  • गणेशोत्सवासाठी मोदकांचे अनेक प्रकार उपलब्ध

  • चॉकलेट मोदकाला मोठी मागणी

  • अनारकली व चंद्रकला विशेष मिठाई

  • गौरी सणासाठी गोडधोड पदार्थ तयार स्वरूपात उपलब्ध

  • गुळाच्या पदार्थांचा वाढतोय ट्रेंड

आम्ही गुळापासून बनवलेल्या पदार्थांची पंरपरा जपली आहे. हे पदार्थ घेणारे ग्राहकदेखील वाढत आहेत. इतर मिठायांची मागणी यावर्षीच्या हंगामात वाढली आहे.

- चेतनकुमार नरखेडकर, काका हलवाई, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT