पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविड च्या परिस्थितीत होणार नाही.
मानाच्या गणपती मंडळांनी समाजहितासाठी उत्सव मंडपातच गणपती विसर्जन करायचा निर्णय यंदाही घेतला आहे. परंपरेनुसार मानाचा पहिला कसबा गणपतीचे विसर्जन होणार आहे.त्यानंतर 45 मिनिटानंतर क्रमवारीनुसार इतर मानाच्या गणपती विसर्जनाला सुरुवात होणार आहे.पुण्यातील मानाच्या पहिल्या गणपतीचे अर्थातच कसबा गणपतीचे विसर्जन झाले आहे. कोरोना महारामारीच्या सावटामूळे गणपतीचे विसर्जन मंडळाच्या मंडपातच करण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यातील मानाच्या गणपतींचे विसर्जन मंडपातच करण्यात येणार आहे. कसबा गणपतीच्या विसर्जनाला सुरुवात झाली गणपतीच्या पालखीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पोलिस सह अतिरिक्त उपायुक्त रविंद्र शिसवे यांनी उपस्थिती लावली.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.