Ganesh Utsav
Ganesh Utsav  esakal
गणेशोत्सव फोटो स्टोरी

Ganesh Utsav 2022: गरीब-श्रीमंत भक्तांचं श्रद्धास्थान! दगडूशेठ हलवाई गणपतीचा इतिहास खास

सकाळ डिजिटल टीम

Ganesh Utsav: पुण्यातील पाच मानाच्या गणपतीत दगडूशेठ हलवाई गणपती नसले तरी सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे.

या मंडळाची स्थापना 1893 साली झाली. 1893 मध्ये श्रीमंत दगडू शेठ हलवाई यांनी ही मुर्तीची स्थापना केली. 1968 साली 'दगडूशेठ गणपती'ची मूर्ती मंडळाने तयार करून घेतली.
प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकरअप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून ही मूर्तिकला पुर्ण झाली. ही मुर्ती घडविताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते.
'दगडूशेठ गणपती'ची मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आले होते. त्या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेशयंत्र बसविले आहे. 'यामुळे त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल,' अशी शिल्पी यांची श्रद्धा होती. त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला. संपुर्ण धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली.
पुढे 1984 मधील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरात या गणेश मुर्तिची स्थापना झाली. या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले होते.
मंदिर परीसर अपुरा पडू लागल्यानंतर 2002 साली सध्याचे जे भव्य मंदिर आहे ते उभारण्यात आले होते. आता संस्थानच्या तीनही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या संस्थानचे नेतृत्व आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: 'नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू'; धमकीचा मेल आल्याने खळबळ

SCROLL FOR NEXT