आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे गणपती उत्सवावर काही निर्बंध होते. यंदा मात्र परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्यानं भाविकांनी आरोग्याची योग्य ती खबरदारी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोलकात्यात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळतो. ओडिशाच्या पुरी बीचवर जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी सुमारे सात हजार समुद्री कवचा वापरून गणपतीचे वाळूचे शिल्प साकारण्यात आले आहे.मुंबईतील मूर्तीकार गणेश मूर्तीवर अंतिम हात फिरवतानाचा क्षण गणेश चतुर्थी उत्सवाचा मुंबईतील लालबाग परिसरातील भक्तगणात उत्साह देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतही गणेशोत्सवाची धामधूम आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जातानाचा एक क्षण गुरुग्राममधील व्यापर सदन परिसरातील एक खास क्षण गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला गणेश मूर्तीला 'फायनल टच' देताना मुंबईतील एक मूर्तीकार देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटा माटात साजरा केला जातो. भोपाळमध्ये गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारात आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर बाप्पाच्या स्वागतासाठीची आतुरता दिसून येते. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.