गणेश उत्सव हा आनंदाचा आणि उत्साहाचा सण आहे. या दहा दिवसांच्या उत्सवात गणपती बाप्पाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवद्य घरोघरी आनंदाने बनवला जातो. गणेशाचे गोड पदार्थांवर प्रेममुळेच घरातील प्रत्येकालात या काळात गोड पदार्थांची मेजवानी मिळते. मोदकांवरील अपार प्रेमामुळेच त्याला 'मोदप्रिया' असे नाव देखील देण्यात आले आहे. मोदक हे त्याचे सर्वात प्रीय अन्न मानले जाते. तसेच भोग म्हणून 21 मोदक अर्पण केल्याने गणेश आणि भगवान शिव एकाच वेळी तृप्त होतात अशी धारणा आहे. मोदकांशिवाय देखील गणेशउत्सवात बाप्पासाठी अनेक गोड पदार्थ तयार केले जातात.
मोदक हे गणपतीचे आवडता खाद्यपदार्थ आहे म्हणून त्यांना 'मोदप्रिया' म्हणूनही ओळखले जाते. गोड मोदकांवर त्याच्या प्रेमाचा उल्लेख असलेल्या अनेक कथा प्रसिध्द आहेत. तांदळाचे पीठ, नारळ, गूळ आणि वाफवून बनवलेले मोदक, तसेच इतरही अनेक प्रकारचे मोदक या उत्ववादरम्यान घरोघरी तयार केले जातात. गणपतीचे आणखी एक आवडते अन्न म्हणजे लाडू. पौराणिक कथांच्या गणेशाच्या लाडूंवरील प्रेमाचा उल्लेख करण्यात आला आहे. गणेशाच्या प्रत्येक फोटोमध्ये आपल्याला लाडू हमखास पाहायला मिळतात. खीर हे एकंदर सर्वच देवतांचे आवडते अन्न असल्याचे मानले जाते आणि यामुळेच खीर हा प्रत्येक भारतीय सणांचा भाग असते. गणपती उत्सवाच्या निमित्ताने दुधासह अनेक प्रकारच्या खीर घरोघरी बनवल्या जातात. जेव्हा कुबेराने गणेशाला जेवणासाठी आमंत्रित केले तेव्हा गणपतीचे काही केल्या पोट भरेना त्यांना अधिक खाण्याची इच्छा होतच राहीले. तेव्हा असे मानले जात होते की भगवान शिवाने त्यांना भक्तीने काही फुगलेले तांदूळ अर्पण केले. असा विश्वास आहे की त्यानंतरच गणेशाची भूक भागली. म्हणूनच गणेश उत्सवात मुरमुरा आणि गुळाचे लाडू तयार केले जातात आणि श्रीगणेशाला नैवद्य म्हणून अर्पण केले जातात.गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गणपतीला केळीपासून बनवलेले हार अर्पण केले जातात. याचे कारण असे की गणपतीला केळी आवडतात आणि बंगाली परंपरेनुसार त्याने केळीच्या झाडाशी लग्न केले आहे. याच कारणामुळे केळीशिवाय गणेश पूजा अपूर्ण आहे.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.