गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी मालिकांमधील कलाकार एकत्र येणार असल्यामुळे गणेशोत्सवाची रंगत द्विगुणीत होणार यात शंका नाही. स्टार प्रवाहवर १२ सप्टेंबरला दाखवल्या जाणाऱ्या ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या गणपती विशेष कार्यक्रमात स्टार प्रवाहच्या नायिकांचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे.ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे.
आई कुठे काय करते मालिकेतील संजनाला आपण आतापर्यंत मॉडर्न अंदाजात पाहात आलोय. मात्र गणपती विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने संजनाचा नऊवारी साडीतला हटके लूक पाहायला मिळणार आहे. तर सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी आणि शालिनीने पारंपरिक साडीला आधुनिकतेची जोड देत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती आणि रंग माझा वेगळा मालिकेतील सौंदर्या इनामदार यांचं साडीमध्ये सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे.स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा डबल धमाका असणार आहे. ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे. सणासुदीचे दिवस म्हटले तर पारंपरिक खेळही ओघाने आलेच. स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या सासू-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखील खेळणार आहेत. रविवार १२ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.