आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल सगळीकडे लागली आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात घरोघरी बाप्पाचे आगमन होणार आहे.
गेल्या दीड वर्षात परंपरागत गणेशोत्सवाचं चित्र काहीसं पालटलेलं जाणवलं आहे. विघ्नहर्त्याच्या आगमनाने बर्याच काळापासून असलेले कोरोनाचे सावट आणि नकारात्मक वातावरण काहीसं दूर राहून सर्वत्र आनंददायी माहोल बघायला मिळेल हीच आशा आहे.
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सोन्याची पावलं' मालिकेत गौरी – गणपतीचे आणि 'राजा रानीची गं जोडी' मालिकेमध्ये गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या जल्लोषात होणार आहे.
'राजा रानीची गं जोडी' मालिकेमध्ये ढालेपाटीलांच्या घरामध्ये बाप्पाचे मोठ्या जल्लोषात आगमन होणार आहे. रणजित घरच्या बाप्पाची स्थापना करणार आहे. घरच्यांनी बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी केली आहे. ढालेपाटीलांच्या घरात थाटामाटात बाप्पाचं आगमन तर होणार आहे, पण या प्रसंगी सगळ्यांना संजूची कमतरता नक्कीच भासणार आहे. संजूवर आता घराची आणि कामाची अशी दुहेरी जबादारी आहे, जी ती उत्तमरीत्या पार पाडत आहे. “खर्या आयुष्यात अनेक मुली, लग्न झालेल्या स्त्रिया त्यांची नोकरी सांभाळून घरातील जबाबदार्या अगदी चोखपणे पार पडताना आपल्याला दिसतात. मला त्या सगळ्या स्त्रिया, मुलींचा अभिमान आणि कौतुक आहे. मी नशीबवान आहे मला अशी भूमिका करण्याची संधी मिळाली”, असं अभिनेत्री शिवानी सोनार म्हणाली. राजा रानीची गं जोडी या मालिकेला अल्पावधीतच लोकप्रियता मिळाली. या मालिकेत शिवानी सोनार आणि मणिराज पवार मुख्य भूमिका साकारत आहेत. 'सोन्याची पावलं' मालिकेमध्ये गौरी गणपतीचे आगमन होणार आहे. पण, भाग्यश्री – दुष्यंतवर खूप मोठं संकट ओढवणार आहे. संकटावर ते दोघे कशी मात करणार, हे प्रेक्षकांना १२ सप्टेंबरच्या एका तासाच्या विशेष भागात संध्याकाळी ७ वाजता पहायला मिळेल. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.