गौरी सजावटीच्या साहित्यांनी सजल्या बाजारपेठा ! Canva
गणेशोत्सव फोटो स्टोरी

गौरी सजावटीच्या साहित्यांनी सजल्या बाजारपेठा !

गौरी सजावटीच्या साहित्यांनी सजल्या बाजारपेठा! स्वदेशी वस्तूंना वाढती मागणी

विजय थोरात

ज्येष्ठा नक्षत्राच्या मुहूर्तावर रविवारी घरोघरी गौरीचे आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या सजावट साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे.

सोलापूर : ज्येष्ठा नक्षत्राच्या मुहूर्तावर रविवारी घरोघरी गौरीचे आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या सजावट साहित्याच्या खरेदीला वेग आला आहे. गौरी मुखवट्यांबरोबरच आरास हा देखील प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय असतो. सध्या बाजारात विविध प्रकारचे दागिने, आभूषणे, त्याचबरोबर अनेक प्रकारची खेळणी विक्रीसाठी उपलब्ध झाली असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ज्येष्ठा नक्षत्राच्या मुहूर्तावर रविवारी घरोघरी गौरीचे आगमन होणार आहे. त्यामुळे सध्या सजावट साहित्याबरोबरच गौरी मुखवट्यांच्या खरेदीला वेग आला आहे.
गौरींच्या मागे सोडलेल्या पडद्यावर मोती, कुंदन, काचेच्या माळा, प्राण्यांच्या सुबक मूर्ती यामुळे गौरीसमोरील सजावटीची शोभा वाढते. त्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे. सजावटीच्या माळा 25 रुपयांपासून ते 300 रुपयांपर्यत विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
प्लास्टिकबंदी असल्याने कागद, क्रेपपासून बनविलेल्या फुलांच्या विविध प्रकारच्या माळा, फुलांची कमान, पानांच्या वेली विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 30 रुपयांपासून ते 250 रुपयांपर्यंत यांचे दर आहेत. नैसर्गिक फुलांप्रमाणे दिसणाऱ्या कागदी, क्रेपच्या फुलांचे गुच्छ, झाडे यांनाही सजावटीसाठी अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
पाना-फुलांच्या माळांबरोबर विजेच्या माळांनाही सध्या अधिक मागणी आहे. स्वदेशी तसेच चिनी बनावटीच्या माळा विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लवंगी, स्टॉब्रेरी, ऍपल आदी आकारातील संगीतमय विद्युतमाळांना यंदा चांगली मागणी आहे. 60 रुपयांपासून ते 2 हजार रुपये किमतीच्या या माळा बाजारात उपलब्ध असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
गौरी मुखवट्यांच्या खरेदीला वेग आला आहे.
बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी महिलांची गर्दी पाहायला मिळत आहे.

फिरते चक्र, भिंगरी लाईट असे नवनवीन प्रकारचे विद्युत रोषणाईचे साहित्य बाजारात विक्रीस आले आहेत. एलईडी व एलजीपीचे रंगीत दिवे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. चिनी माळांपेक्षा स्वदेशी माळांचे दर अधिक असले तरी चायना मेड खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद कमी आहे.

गौरींना बहुदा ताज्या फुलांचे हार घातले जातात. ताजे हार सर्वच भाविकांना अशक्‍य असल्याने दररोजच्या पूजेसाठी फुलांचा वापर केला जातो. मात्र, कृत्रिम हार आवर्जून गळ्यात घालण्यात येतात. पारंपरिक मण्यांच्या हारांसह कागदी, क्रेपच्या फुलांचे हार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शिवाय पर्यावरणपूरक सुगंधी हार बाजारात विक्रीसाठी आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT