गणपती बाप्पा हे भाविकांचं लाडकं दैवत. जगभरातील काही देशांमध्ये गणेशाचं वास्तव्य असल्याचं तिथल्या मंदिरावरुन दिसून आलं आहे. म्यानमार, सिंगापूर, थायलंडमध्ये गणेशाच्या मूर्ती पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. या बातमीच्या निमित्तानं आपण देशातील सर्वात प्रसिद्ध अशा गणपती मंदिरांविषयी जाणून घेणार आहोत. राज्य, त्या राज्याचं वैशिष्टय आणि गणपती मंदिर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत. देशभरातील प्रसिद्ध बारा मंदिरं आणि त्यातील श्रीगणेशाच्या मूर्तीबद्दल माहिती करुन घेऊया.
सासिव काळू, कडाले काळू गणेश मंदिर - हंप्पी कर्नाटकातील हंपी हे मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. हंपी पूर्वी विजयानगरची राजधानी होती. 1440 ख्रिस्तपूर्व मध्ये या मंदिराची स्थापना करण्यात आली होती. या मंदिरामध्ये श्री गणेशाच्या दोन मुर्ती आहेत...
कराप्पा विनयानगर मंदिर - पिल्लायिरापत्ती सोळाशे वर्ष जुनं असणारं हे मंदिर आजही तितकचं सुंदर आहे जेवढे ते पूर्वी होतं. या मंदिराचा परिसरही लक्ष वेधून घेणारा आहे. सहा फुट उंचीची गणेशमुर्ती फारच सुंदर आहे. ती पाहण्यासाठी जगभरातून भाविक या ठिकाणी येतात. रॉक फोर्ड उच्ची पिलियार कोईल मंदिर - तामिळनाडू तिरुचिरापल्लीमधील एका उंच टेकडीवर हे मंदिर आहे. तिथे जाणं हा वेगळा अनुभव आहे. एका भल्यामोठ्या खडकावर हे मंदिर बांधण्यात आले आहे. गणपती पुळे - रत्नागिरी समुद्राच्या किनारी असलेलं हे गणेश मंदिर पाहणं हा एक नितांत सुंदर अनुभव आहे. या मंदिरातील गणेशाची मूर्ती संशोधक आणि अभ्यासकांच्या जिज्ञासेचा विषय आहे.
गणेश टोक मंदिर - गंगटोक गंगटोक मधील सर्वात प्रसिद्ध असणारे मंदिर म्हणून गणेश टोक मंदिराचा उल्लेख करावा लागेल. हिल स्टेशनवरील मंदिर म्हणूनही त्याची ओळख आहे. मोती डुंगरी गणेश मंदिर, जयपूर सेठ जयराम पालीवाल यांनी अठराव्या शतकामध्ये हे गणेश मंदिर बांधलं होतं. ते पाहण्यासाठी लांबून गणेश भक्त आणि पर्यटक येतात. जयपूरमधील सर्वात लोकप्रिय असणारं टूरिस्ट स्पॉट म्हणून या मंदिराच्या नावाचा उल्लेख करता येईल. रणथंबोर गणेश मंदिर - राजस्थान आपल्याला रणथंबोरमधील राष्ट्रीय उद्यान माहिती आहे. पण त्याठिकाणी एक प्रसिद्ध गणेशमंदिरही आहे. त्याठिकाणी येणारे पर्यटक हे त्रिनेत्र गणेश मंदिराला आवर्जुन भेट देतात. मधूर महागणपती मंदिर - केरळ दहाव्या शतकात हे गणपती मंदिर बांधण्यात आले होते. ते मधूवाहिनी या नदीच्या तीरावर आहे. कासारगोड मधील या मंदिराची शिल्पकला हा अजोड सौंदर्याचा नमुना आहे. मायपडी राजसनं या मंदिराची उभारणी केली होती. मनकुला विनायक मंदिर - पाँडेचेरी फ्रेंचाच्या काळात हे मंदिर बांधल गेलं आहे. त्याचा कालावधी हा 1666 च्या दरम्यानचा आहे. अजूनही त्या मंदिराचे बांधकाम मजबूत आहे. हे मंदिर पाहण्यासाठी देशभरातून पर्यटक, भाविक येत असतात. ब्रम्होत्सव आणि गणेशोत्सव हा या मंदिरातील प्रमुख उत्सव आहे. कनिपक्कम विनायक मंदिर - चित्तुर आंध्रप्रदेश राज्यात असणाऱं चित्तुर हे तिरुपतीपासून 75 किमीवर आहे. भारतातील पुरातन काळातील गणपती म्हणून या गणपती मंदिराची ओळख आहे. ते त्याच्या शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहेश्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, पुणे...
पुण्यात आल्यानंतर श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात जाणं झालं नाही असं होत नाही. पुणेकरांचं श्रद्धास्थान असणाऱ्या दगडूशेठ मंदिरात असणाऱ्या श्रींची मूर्ती फारच लक्षवेधी आहे. देशभरातून मोठ्या संख्येनं गणेशभक्त हे मंदिर आणि दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. सिद्धिविनायक गणपती मंदिर - महाराष्ट्राची राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये हे मंदिर आहे. या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटीं सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात. रात्रीच्या वेळी सिद्धिविनायक गणपती मंदिराचं सौंदर्य खुलून दिसतं. Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.