Phulambri  sakal
घरचा बाप्पा

Phulambri : शेतकऱ्यांना सरसकट पीकविमा तातडीने द्या!';संभाजी ब्रिगेडची तहसीलदारांकडे मागणी

तालुक्यातील सुमारे ४० हजार शेतकऱ्यांनी मागीलवर्षी पीकविमा काढला होता. एक वर्ष उलटूनही अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीकविमा मिळाला नाही.

सकाळ वृत्तसेवा

फुलंब्री : तालुक्यातील सुमारे ४० हजार शेतकऱ्यांनी मागीलवर्षी पीकविमा काढला होता. एक वर्ष उलटूनही अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीकविमा मिळाला नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला आहे, अशा शेतकऱ्यांना सात दिवसांत सरसकट पीकविमा द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला.

तालुक्यातील शेतकऱ्यांचे मागीलवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे तालुक्यातील ४० हजार शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांचा विमा काढलेला आहे. मागीलवर्षी पावसाचे प्रमाण कमी असल्याने संपूर्ण खरीप हंगाम वाया गेला. परिणामी, रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना पाण्याअभावी पिके घेता आली नाहीत. त्यामुळे मागीलवर्षी खरीप हंगामात काढलेला पीकविमा वर्ष उलटूनही शेतकऱ्यांना मिळाला नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करू लागल्या आहेत.

विमा कंपनीत तुपाशी अन् शेतकरी उपाशी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सात दिवसांत तत्काळ शेतकऱ्यांना सरसकट पैसे देण्यात यावे, अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्यावतीने तालुकाध्यक्ष गणेश मोटे, जिल्हा संघटक अमोल वाहटुळे, आप्पासाहेब कापरे, संदीप गडवे व रवींद्र वाहटुळे यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Real Estate : पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल २१ टक्के घट; देशातील प्रमुख शहरांत काय आहे स्थिती? धक्कादायक अहवाल समोर

Mumbai Police: मुंबईतील १५ ठाण्यांची सीमा नव्याने ठरणार, पोलिसांचा हद्दीचा वाद मिटणार; कोणत्या ठाण्यांचा समावेश?

IND vs SL 2nd Test: ठणठणीत खेळपट्टी गोलंदाजांना सतावणार; भारत- श्रीलंका यांच्यातील दुसरी कसोटी आजपासून

Third Mumbai: 'तिसरी मुंबई' साठी भूसंपादनाला वेग! ५५० एकर जमीन अन् चार हजार कोटी रुपयांचा खर्च

Krishnaraj Mahadik : कृष्णराज महाडिकांची राहुल गांधींवर सडकून टीका; “छात्रों की गूंज नाही, पैशांची गूंज आहे,”, दिलं थेट आव्हान

SCROLL FOR NEXT