Kabul Blast esakal
ग्लोबल

Kabul Blast : काबुलमध्ये सैन्य तळावर बॉम्बस्फोट, दहा जणांचा मृत्यू; 'या' संघटनेने घेतली जबाबदारी

सकाळ डिजिटल टीम

Afganistan Attack : अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये रविवारी मोठा बॉम्बस्फोट झाला. या घटनेने संपूर्ण देश हादरुन गेला आहे. स्फोटाच्या घटनेत आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे.

आज रविवारी हा स्फोट झाला. १० मृत्यू आणि ८ लोख जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा हल्ला अफगाणिस्तान सैन्य दलाच्या हवाई तळावर झाला आहे. मंत्रालय प्रवक्ते अब्दुल नाफी टाकोर यांनी सांगितलं की, जिथं हा हल्ला झाला तिथं काबुलचं आंतरराष्ट्रीय विमानतळ असून या स्फोटाचं कारण समजलेलं नाही.

टाकोर यांनी सांगितल्यानुसार, या स्फोटात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तपास अधिकारी या प्रकरणाची कसून चौकशी करीत आहेत. काबुलमधील या हल्ल्याने देशामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

ऑगस्ट २०२१मध्ये तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता काबीज केली. त्यानंतर देशाच्या सुरक्षेत वाढ केल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. परंतु नवीन सत्तास्थापनेनंतर देशामध्ये स्फोट आणि हल्ले झालेले आहेत.

काबुलवर आज झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपच्या सदस्यांनी घेतली आहे. मागच्या महिन्यात काबुलमधील एका हॉटेलवर हल्लेखोरांनी अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली होती. यामध्ये ५ चिनी नागरीक जखमी झाले होते. ज्या हॉटेलमध्ये हल्ला ते चिनी लोक थांबण्याचा ठिकाण होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Drug Racket : पुण्यात एमडी ड्रग्ज विक्रीसाठी डिलिव्हरी अ‍ॅपचा वापर; मोठे रॅकेट उघड, चार जण अटकेत

Satara Politics: सातारा झेडपीची अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रद्द करा;राष्ट्रवादीचे विभागीय आयुक्तांकडे अपील, जिल्हाधिकारी, एसपींबाबत तक्रार!

Yo Yo Honey Singh Pune show : यो यो हनी सिंगचा पुण्यातला शो होणार रद्द, थेट एसपींकडे तक्रार; गाण्यावर घेत आक्षेप

What is Anjaneri Ropeway Project? हनुमान भक्तांसाठी मोठी बातमी! सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी अंजनेरीला मिळणार नवं रूप; आता डोंगरावर चढण्याची कसरत संपणार!

NCP MLAs leaving party : राष्ट्रवादी काँग्रेसचे २५ ते ३० आमदार पक्ष सोडणार?, हसन मुश्रीफांनी एका वाक्यात कंडका पांडला

SCROLL FOR NEXT