1000-year-old-chicken-egg-found- esakal
ग्लोबल

इस्राईल : उत्खननात सापडली 1 हजार वर्षे जुनी कोंबडीची अंडी

सकाळ डिजिटल टीम

मध्य इस्राईलच्या 'यवने' शहरामध्ये पुरातत्व खात्यानं केलेल्या उत्खननात सुमारे 1000 वर्षे जुनी कोंबडीची अंडी सापडली आहेत. हो हे खरं असून ही अंडी 10 व्या शतकातील असल्याचा दावा केला जात आहे. मध्य इस्राईलमध्ये शहरी विकास प्रकल्प सुरू असल्याने तिथे उत्खनन सुरु आहे.यावेळी ही अंडी सापडली आहेत. (1000-year-old-chicken-egg-found-israel-marathi-news)

हा एक अत्यंत दुर्मिळ शोध...

इस्राईलच्या पुरातत्व विभागाचे तज्ज्ञ डॉ ली पेरी गाल यांनी सांगितले,की इस्राईलमधील हा एक अत्यंत दुर्मिळ शोध आहे. उत्खननावेळी संपूर्ण अंडी मिळणे कठीण आहे. तसेच त्यांनी सांगितले की यापूर्वीही इस्त्राईलमध्ये प्राचीन अंडी शेल जेरूसलेममधील डेव्हिड शहरात बऱ्याचदा आढळली आहेत. इस्राईलमधील पुरातत्वशास्त्रज्ञ अल्ला नागोर्स्की म्हणाले, हे अंडे सुरक्षित राहण्यामागं ते इतकी वर्षे एका विशेष अशा स्थितीत असल्याचं कारण त्यांनी सांगितलं. हे अंडे मानवी विष्ठेत पडले होते आणि यामुळे ते सुरक्षित राहिल्याचा दावा त्यांनी केला.

फेसबूकवर लाईक्सचा पाऊस

पुरातत्वशास्त्रज्ञ अल्ला नागोर्स्की म्हणाले की हे अंडे आता तुटलेले आहे आणि त्याच्या आतला भाग बाहेर आला आहे. मात्र काही अजुन भाग शिल्लक आहे. याद्वारे भविष्यात अंड्यांची अधिक चाचणी केली जाऊ शकते. फेसबुकवर या अंड्यांचे फोटो आणि माहिती पोस्ट केल्यापासून यावर लाइक्सचा पाऊस पडला आहे.

पुरातत्व विभागाकडून सांगण्यात आले आहे की, हे अंडे दहाव्या शतकातील प्राचीन स्थळ असलेल्या ठिकाणी सापडले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना यावेळी इस्लामिक काळातील एक मलकुंडही सापडला आहे. हे मलकुंड खोदताना त्यामध्ये हे अंडे दिसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar crime control: दहशत माजवणाऱ्या संदिप फटाकडेला छ. संभाजीनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

Marathi News Live Updates : माढ्यात सीना नदीत ५ तरुण बुडाले

Sugarcane Mechanization: ऊसतोड मजुरांच्या मनमानीला कंटाळून शेतकऱ्यांचा यंत्रांकडे मोर्चा; आधुनिक हार्वेस्टरमुळे वेळ व खर्चात बचत

Banjara ST reservation protest: येलदरी जलाशयात बंजारा समाजाचे जलसमाधी आंदोलन; विनोद आडे यांच्या आमरण उपोषणाला व्यापक पाठिंबा

Manwat Health Services Review: सुट्टीच्या दिवशी आरोग्य सुविधांची तपासणी; महालक्ष्मी सणात महिला कर्मचाऱ्यांची ड्युटीमुळे तारांबळ

SCROLL FOR NEXT