11 bodies found in Babas ashram 11 bodies found in Babas ashram
ग्लोबल

अनुयायांना लघवी, विष्ठा देणाऱ्या बाबाच्या आश्रमात सापडले ११ मृतदेह

सकाळ डिजिटल टीम

भारतातच नाही तर परदेशातही भोंदू बाबांचा वावर आहे. या भोंदू बाबांकडून अनेकांची फसवणूक केली जाते. तर महिलांवर अत्याचार केला जातो. अनेक वर्षे हा प्रकार सुरू असतो. हा प्रकार समोर आल्यानंतर धक्का बसतो. अशाच एका प्रकारात पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली आहे. या बाबाने अनुयायांना मलमूत्र पाजल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी त्याच्या आश्रमातून सुमारे ११ अनुयायांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. हा प्रकार थायलंडमधील चायफुम येथे घडला. (11 bodies found in Babas ashram)

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, थवी नानारा (७५) असे आरोपी बाबाचे नाव आहे. या भोंदू बाबाने अनुयायी लघवी प्यायचे आणि विष्ठाही खात होते. असे केल्याने रोग दूर राहतो, अशी अनुयायांची धारणा होती. थवी नानारा याने लोकांच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे ताबा केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तसेच बाबांनी (Bhondu Baba) कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याची बाबही समोर आली आहे.

महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात कुटुंबीयांकडून दाखल करण्यात आली होती. महिला बाबाकडे गेल्यानंतर परत आलीच नाही, असे तक्रारीत सांगण्यात आले होते. यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. बाबाला (Bhondu Baba) त्याच्या जंगलातील आश्रमातून अटक (arrested) करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

मृतदेह होते शवपेटीत

या बाबाला पोलिस अटक (arrested) करीत असताना अनुयायांनी एकच गोंधळ घातला. आश्रमातून जे मृतदेह बाहेर काढण्यात आले ते सर्व शवपेटीमध्ये होते. त्याने स्वतःला सर्व धर्मांचे जनक असल्याचा दावाही अहवालात केला आहे. सध्या या बाबाला अटक करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT