citizens displaced sakal
ग्लोबल

Displaced Citizens : जगात ११ कोटी नागरिक विस्थापित; ‘यूएनएचसीआर’ची माहिती

निर्वासितांसाठी सर्वसमावेशक आरोग्य प्रणाली तयार करण्यास आणि जगभरातील निर्वासितांची समान काळजी घेण्यावर ‘डब्लूएचओ’ने भर दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ), ‘संयुक्त राष्ट्रांचे निर्वासितांसाठी उच्चायुक्त’ (यूएनएचसीआर) ही ‘यूएन’ची निर्वासितांसाठी काम करणारी संघटना आणि इतर संस्थांनी २० जून रोजी जागतिक निर्वासित दिनाचे आयोजन केले होते. यंदा या दिनासाठी ‘निर्वासितांना समर्थन’ ही संकल्पना राबविण्यात आली.

निर्वासितांसाठी सर्वसमावेशक आरोग्य प्रणाली तयार करण्यास आणि जगभरातील निर्वासितांची समान काळजी घेण्यावर ‘डब्लूएचओ’ने भर दिला आहे. जबरदस्तीने विस्थापित झालेल्यांचे माहिती ‘यूएन’कडे नोंदविण्यात आली असून ‘यूएनएचसीआर’च्या अंदाजानुसार २०२३ च्या अखेरपर्यंत जगभरात ११ कोटी ७३ लाख लोक जबरदस्तीने विस्थापित झाले होते.

कोलंबिया, जर्मनी, इराण, पाकिस्तान आणि तुर्कियेने जगातील पाचपैकी दोन निर्वासित आणि आंतरराष्ट्रीय संरक्षणाची गरज असलेल्यांना आश्रय दिला आहे.

‘यूएनएचसीआर’च्या माहितीनुसार एकूण निर्वासितांपैकी जवळजवळ तीन चतुर्थांश आणि आंतरराष्ट्रीय संरक्षणाची गरज असलेले अन्य लोक फक्त पाच देशांमधून विस्थापित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Numerology: स्वतःचेच रील्स पुन्हा पुन्हा पाहतात 'या' मूलांकांचे लोक! पाहा कोणत्या तारखेला जन्मलेले लोक असतात 'सेल्फ लव्हर'...

Sugarcane Crushing Season : १५ ऑक्टोबरपासूनचा गाळप हंगामाचा निर्णय रद्द करावा; विविध संघटनांची साखर आयुक्तांकडे मागणी

Kokan Railway : पाच वर्षांत कोकण रेल्वेवर रोज १०० हून अधिक गाड्या; दुपदरीकरणाला वेग, २२ सप्टेंबरला कोकण रेल्वे होणार कर्जमुक्त

Mumbai High Court : घटस्फोटाच्या निकालाला स्थगिती असताना पत्नीला घराबाहेर काढता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

SCROLL FOR NEXT