Russian military cargo 
ग्लोबल

Russian Plane Crash Video: रशियन विमानाच्या इंजिनला आग लागली अन् अनर्थ घडला; 15 जणांच्या मृत्यूचा व्हिडिओ व्हायरल

Russian military cargo: रशियाच्या इवानोनो प्रांतामध्ये हा अपघात झाला आहे. रशियातील मीडिया न्यूजनुसार, अपघातात विमानात असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- रशियाच्या एका लष्करी विमानाचा अपघात झाला आहे. यात पंधरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमानाच्या एका इंजिनला आग लागल्याने ही दुर्दैवी घटना घडली. रॉयटर्सने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (15 people were killed after a Russian military cargo plane crashed)

रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलं की, रशियाच्या इवानोवा प्रांतामध्ये हा अपघात झाला आहे. रशियातील मीडिया न्यूजनुसार, अपघातात विमानात असलेल्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रशियाची राजधानी मॉस्कोच्या उत्तर पूर्व भागातील इवानोवा भागात हा अपघात झाल्याचं सांगण्यात येतंय. विमानातील सर्व पंधराही प्रवासी जिवंत जळाले आहेत. मीडियातील माहितीनुसार, मंगळवारी विमानाने उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एका इंजिनला आग लागली. इलुशिन-II 76 प्रकाराचे हे विमान होते. विमानामध्ये एकूण १५ लोकांपैकी ८ क्रू मेंमर आणि सात प्रवाशी होते.

व्हिडिओमध्ये दिसतंय की विमानाच्या एका भागाला आग लागली आहे. विमानातून धूराचे लोट निघत आहेत. त्यानंतर विमान अनियंत्रीत होऊन खाली कोसळते. अनेकांनी या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये शूट केला आहे. इंजिनमध्ये बिघाड कशामुळे झाला याचा तपास केला जाणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT