ग्लोबल

आयफोनसाठी 'त्या'ने विकली किडनी

वृत्तसंस्था

बीजिंग- तरुण पिढीला मोबाइलचे व्यसन लागल्याने अनेक दुष्परिणामांना सामोरं जावं लागत आहे. त्यातच चीनमधील एका तरुणानं आयफोनसाठी चक्क स्वतःची किडनी विकल्याचे समोर आले आहे. या तरुणानं किडनी विकून आयफोन खरेदी केला खरा. परंतु, आता या तरुणाला त्याची चूक समजली असून तो गेल्या सात वर्षांपासून अंथरुणाला खिळून पडल्याने मरण यातना भोगत आहे. 

एक किडनी काढल्यानंतर त्याचे काहीही दुष्परिणाम होणार नाहीत. उलट आठवडाभरानंतर तो पूर्वीसारखाच तंदुरुस्त होईल, असे त्या तरूणाला सांगण्यात आले होते. परंतु, दुर्दैवाने त्याला किडनीची शस्त्रक्रिया करताना संसर्ग झाला. त्यामुळे गेल्या 7 वर्षापासून तो अंथरुणात पडून आहे. त्याच्यावर उपचार करण्यासाठी आता त्याच्या कुटुंबाकडे पैसेही नाहीत. 

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, चीनच्या जिओ वँग नावाच्या एका तरुणाची कहाणी आहे. सात वर्षापूर्वी त्याने 'आयफोन-4' खरेदी करण्यासाठी स्वतःची किडनी विकली होती. 'आयफोन-4' ज्यावेळी लाँच झाला त्यावेळी जिओ वँग अवघ्या 17 वर्षाचा होता. व तो विद्यार्थी होता. त्यावेळी शाळेत आयफोन म्हणजे प्रतिष्ठा समजली जात होती. आयफोन विकत घेवून मित्रांमध्ये शायनिंग मारण्यासाठी त्यानं किडनी विकण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT