Brazil police raid  E Sakal
ग्लोबल

Brazil: पोलीस आणि ड्रग माफियांमधील चकमकीत २१ जणांचा मृत्यू

ब्राझीलमधील रिओ येथील घटना

हलिमाबी कुरेशी

व्हीला क्रुझेराओ फवेला येथे लष्करी पोलिसांनी अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळी विरुद्ध कारवाई केली. गुंड आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत २१ जणांचा मृत्यू झालाय.

यात व्हीला क्रुझेराओच्या बाजूने जाणाऱ्या 41 वर्षीय महिलेला देखील गोळी लागून मृत्यू झालाय. अलीकडची लष्करी पोलिसांची सर्वात भयानक कारवाई असल्याचं सांगितलं जातंय. २४ मे च्या पहाटे ४ वाजता लष्करी पोलिसांनी एका दाटीवाटीच्या वस्तीत जोरदार गोळीबार केला. यामुळे जवळच्या परिसरात घबरहाट निर्माण झाली, दुपारी पुन्हा गोळीबार झाल्याचं रॉयटर्स च्या पत्रकाराने सांगितलं.

पोलिस ऑपरेशनमध्ये हेलिकॉप्टरचा देखील वापर कऱण्यात आला होता. गुन्हेगारांच्या म्होरक्याला यात लक्ष्य करण्यात आले होते. व्हर्मिल्हो असं त्या म्होरक्याचं नाव असून तो व्हिला क्रुझेरो परिसरात राहत होता.रिओ पोलिसांनी याविषयी चौकशी सुरु केलीय. या ऑपरेशनची माहिती देण्यासाठी लष्करी पोलिसांना दहा दिवसांचा अवधी देण्यात आलाय. प्रत्येक मृत्यूला कोण जबाबदारय याचं उत्तर त्यांच्याकडुन मागविण्यात आलंय.

लष्करी पोलिस आणि फेडरल हायवे पोलिस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. या ऑपरेशनमध्ये १६ वाहनं १३ ऑटोमॅटीक रायफल्स आणि ग्रेनेड जप्त करण्यात आलेत

याचठिकाणी मागील वर्षी पोलिस आणि अमली पदार्थ तस्करांमध्ये झालेल्या हिंसाचारात २८ जणांचा मृत्यू झाला होता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Inflation: पाकिस्तान संकटात! अन्न टंचाई, डिझेल-LPG महागाईने जनतेचं कंबरडं मोडलं

LPG Crisis : एलपीजी संकटादरम्यान सरकारने आखली मोठी रणनीती, सामान्यांना दिलासा; गॅस सिलिंडर अन् PNG बाबत महत्त्वाची अपडेट समोर

Horoscope : उद्या अश्विनी मेषेर्कचा दुर्लभ योग! मेषसह 'या' 4 राशींना आर्थिक लाभ संभवतो; महिन्याभरात होईल भरभराट, नात्यात कलाटणीचा क्षण

Bihar Politics: ''बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे दोन नेते ठरवणार'', प्रशांत किशोर काय बोलले?

Latest Marathi News Live Update: रत्नागिरीत बंदुकीने गोळ्या झाडून घेत युवकाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT