accident  sakal
ग्लोबल

पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; व्हॅन दरीत कोसळल्याने 22 ठार

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात बुधवारी एक मोठा रस्ता अपघात झाला असून, एक प्रवासी व्हॅन 100 फूट खोल दरीत कोसळून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत व्हॅनमधील 23 पैकी 22 जणांचा मृत्यू झाला असून, एक बालक गंभीर झाला आहे, अशी माहिती जिल्हा उपायुक्त हाफिज मुहम्मद कासिम यांनी दिली आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, हा अपघात झोब राष्ट्रीय महामार्गावरील किल्ला सैफुल्ला परिसरात झाला असून, व्हॅनमधील 23 जणांपैकी 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एक बालक गंभीर जखमी असल्याची माहिती समजत आहे. बुधवारी सकाळी सुमारे 23 जणांसह ही व्हॅन लोरलाईहून झोबकडे निघाली होती. त्यावेळी अचानक व्हॅन दरीत कोसळली. यामध्ये व्हॅनमधील 22 जणांचा मृत्यू झाला.

मृतांमध्ये पाच मुलांचा समावेश

या अपघातात एक अल्पवयीन मुलगा जखमी झाला असून त्याला क्वेटा येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे मदत व बचाव पथकाने सांगितले. तर, अपघातातील सर्व मृत प्रवाशांचे मृतदेह किल्ला सैफुल्ला जिल्हा मुख्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले असून, मृतांमध्ये पाच मुले, पाच महिला आणि 11 पुरुषांचा समावेश आहे.

घटनेनंतर परराष्ट्र मंत्र्यांकडून शोक व्यक्त

दरम्यान, या भीषण अपघाताबद्दल पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसेच बिलावल यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka CM: कर्नाटकच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? तारीख आली समोर, डीके शिवकुमार २५वे मुख्यमंत्री होणार

Pune Civic Funds: पुणे महापालिकेला समाविष्ट ३२ गावांचा जीएसटी परतावा थकित; १८८६ कोटींअभावी पायाभूत विकास अडखळला

Latest Marathi Update Live: विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका आणि इतर मुद्द्यांवरून भोपाळमध्ये आंदोलन

तो ३०- ४० जण घेऊन माझ्या घराजवळ... पुसदमध्ये 'चला हवा येऊ द्या' फेम अंकुर वाढवेवर टोळक्याकडून हल्ला; नेमकं काय घडलं?

Karnataka CM : DK शिवकुमार यांची काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड; कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार; नव्या मंत्रिमंडळात कोणाला लागणार लॉटरी?

SCROLL FOR NEXT