Pakistan Snowfall google
ग्लोबल

पाकिस्तान : जोरदार बर्फवृष्टीमुळे २२ प्रवाशांचा कारमध्येच मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानातील मर्री आणि पंजाब प्रांतात जोरदार बर्फवृष्टी (Pakistan Snowfall) झाली. बर्फवृष्टीमुळे पर्यटक रात्रभर कारमध्ये अडकून पडले होते. कडाक्याची थंडा आणि श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळे २२ प्रवाशांचा कारमध्येच मृत्यू झाला आहे.

मर्री हिल स्टेशनला डोंगरांची राणी म्हटलं जातं आणि हिवाळ्यात याठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. सध्या याठिकाणी मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होत आहे. शनिवारी देखील शेकडो पर्यटक बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी इथं आले होते. पण, अचानक जोरदार बर्फवृष्टी झाली. त्यामुळे अनेक पर्यटक कारमध्येच अडकले. कडाक्याची थंडी आणि ऑक्सिजन न मिळाल्यामुळे पर्यटकांचा कारमध्येच मृत्यू झाला. मृतांमध्ये महिला आणि १० लहान मुलांचा देखील समावेश आहे. इस्लामाबादमधील पोलिस अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांचा देखील यामध्ये समावेश आहे. सध्या घटनास्थळी सैन्यदलाकडून बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत ११००० लोकांना वाचविण्यात यश आले आहे.

पाकिस्तान सरकारने या परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच इस्लामाबाद-मर्री राष्ट्रीय महामार्ग बंद केला आहे. या भागात आणीबाणी घोषित करण्यात आल्याची देखील माहिती आहे. तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Salem Release Plea : कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका ! १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात सुटका नाही; याचिका फेटाळली

“काजोलला कळलं तर मार पडेल…” तब्बूसोबत अजय देवगणची जवळीक पाहून चाहते म्हणाले... Viral Video

Pune Ganeshotsav Traffic Changes: गणेशोत्सवात पुण्यात मोठा वाहतूक बदल; 12 ते 26 सप्टेंबरपर्यंत 'या' रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

रखडलेल्या ठाकुर्ली उड्डाणपुलाला मुहूर्त, सात खासगी मिळकतींचा प्रश्न मार्गी; १० वर्षांचा तिढा सुटला

SCROLL FOR NEXT