Chewing Gum Candy esakal
ग्लोबल

च्युइंगम खाल्ल्यामुळं 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

च्युइंगम खाल्ल्यानं 23 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागलाय.

ड्रग्स मिश्रीत च्युइंगम (Chewing Gum Candy) खाल्ल्यानं 23 वर्षीय तरुणीला आपला जीव गमवावा लागलाय. वास्तविक, दोन मैत्रिणींनी ही नशा कँडी खाल्ली होती. काही वेळातच या दोघीही आजारी पडल्या आणि नंतर एकीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी (Police) एका व्यक्तीला अटक केलीय.

द सनच्या रिपोर्टनुसार, हे प्रकरण पूर्व लंडनमधील (London) आहे. इथं दोन मैत्रिणींनी कँडी खाण्याचा प्लॅन केला. त्यापैकी एकीनं मेसेजिंग अॅपद्वारे क्लास बी कँडी ऑर्डर केली. त्यानंतर ही कँडी त्यांच्या घरी पोहोचवण्यात आली. ही कँडी Trrlli Peachie O's या ब्रँडची असून ही ड्रग्स मिश्रीत च्युइंगम कँडी खाल्ल्याबरोबर दोन्ही मुलींची प्रकृती खालावली. यानंतर दोघींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला.

पोलिस अधिकाऱ्यानं सांगितलं की, मुलींची वैद्यकीय चाचणी आणि कॅंडी सेवन केलेल्या रिपोर्टची (Medical Test Report) आम्ही वाट पाहत आहोत. सध्या तिच्या 21 वर्षीय मैत्रिणीला उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलंय. या प्रकरणी 37 वर्षीय लिओन ब्राउनला अटक करण्यात आलीय, असं त्यांनी नमूद केलं. महिन्याभरापूर्वीही अशीच एक घटना घडली होती. त्याचा आणि या घटनेचा काही संबंध आहे का याचा पोलिस तपास करत आहेत. या प्रकरणानंतर मुख्य अधीक्षक स्टुअर्ट बेल (Stuart Bell) यांनी नागरिकांना इशारा वजा आवाहन केलंय. सर्व नागरिकांनी बेकायदेशीर गोष्टींचं सेवन बंद करावं, असं आवाहन त्यांनी केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT